थिएटर कमी मिळूनही 'एकदा येऊन तर बघा'ची बॉक्स ऑफीसवर विक्रमी कमाई

Santosh Sakpal December 10, 2023 02:26 PM

गेल्या अनेक दिवसांपासुन मराठी मनोरंजन विश्वात विविध सिनेमांना प्रेक्षकांचं प्रेम मिळतंय. २०२३ मध्ये वेड, वाळवी, बाईपण भारी देवा, आत्मपॅफ्लेट आणि नुकताच रिलीज झालेला झिम्मा 2 अशा सिनेमांनी प्रेक्षकांचं प्रेम मिळवलं.

अशातच काल ८ डिसेंबरला एकदा येऊन तर बघा एकदा येऊन तर बघा हा मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. थिएटर कमी मिळूनही सिनेमाने बॉक्स ऑफीसवर चांगली कमाई केली असल्याचं दिसतंय. जाणून घ्या.

‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 90.69 लाख रुपयांची कमाई केली आहे. बॉक्स ऑफिस कलेक्शनचे विभाजन खालीलप्रमाणे आहे:

मुंबई : रु.35.19 लाख

मराठवाडा : रु.09.47 लाख.

संपूर्ण महाराष्ट्र : रु. ४६.०३ लाख

हेमंत ढोमे याच्या ‘झिम्मा २’ नंतर आणखी एका चित्रपटाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद लाभतो आहे तो म्हणजे प्रसाद खांडेकर याचा ‘येऊन तर बघा’ हा चित्रपट. दोन दिवसातच या चित्रपटाने लाखोंची कमाई करत सगळ्यांना चकीत केलं आहे.
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम प्रसाद खांडेकर लिखित ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटात विशाखा सुभेदार, सयाजी शिंदेची, भाऊ कदम, तेजस्विनी पंडित, नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकर, ओंकार भोजने आणि गिरीश कुलकर्णी या कलाकारांची फौज आहे. ८ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशीच ९० लाख ६९ हजारांची कमाई केली आहे. पुढील २ दिवसात हा चित्रपट कोटींचा आकडा पार करेल यात शंकाच नाही. चित्रपटाला पहिल्याच दिवशी मिळालेला उत्तम प्रतिसाद पाहून निर्मात्यांसह दिग्दर्शक आणि कलाकार भारावून गेले आहेत. प्रत्येकजण चित्रपटाचं कौतुक करताना दिसत आहे.