देशात ६३ टक्के तर महाराष्ट्रात ५२ टक्के मतदान !
Santosh Gaikwad
May 13, 2024 11:06 PM
मुंबई, दि. १३ : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात १० राज्यातील ९६ लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान पार पडले. चौथ्या टप्प्यात एकूण ६३.०४ टक्के नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. या टप्प्यात पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मतदानाची नोंद झाली. तर जम्मू काश्मीरमध्ये सर्वात कमी मतदान झाल्याचं बघायला मिळालं.
राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात आज सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली असून सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी सुमारे ५२.४९ टक्के मतदान झाले आहे.
मतदारसंघनिहाय टक्केवारी :
नंदुरबार - ६०.६० टक्के
जळगाव - ५१.९८ टक्के
रावेर - ५५.३६ टक्के
जालना - ५८.८५ टक्के
औरंगाबाद - ५४.०२ टक्के
मावळ - ४६.०३ टक्के
पुणे - ४४.९० टक्के
शिरूर - ४३.८९ टक्के
अहमदनगर - ५३.२७ टक्के
शिर्डी - ५२.२७ टक्के
बीड - ५८.२१ टक्के