एल्‍गी (ELGi) कडून हॅनोव्‍हर मेस्‍से २०२३ येथे एडवान्‍स्‍ड कम्‍प्रेस्‍ड एअर सोल्‍यूशन्‍स सादर

Santosh Sakpal April 24, 2023 11:23 PM


कमी जीवनचक्र खर्चांमध्‍ये ग्राहकांना कम्‍प्रेस्‍ड एअर देण्‍याप्रती कटिबद्धता केली अधिक दृढ 

मुंबई: एल्‍गी (बीएसई: ५२२०७४ एनएसई: ELGIEQUIP) या जगातील अग्रगण्‍य एअर कम्‍प्रेसर उत्‍पादक कंपनीने आज हॅनोव्‍हर मेस्‍से येथे कमी जीवनचक्र खर्चाच्‍या कम्‍प्रेस्‍ड एअर सोल्‍यूशन्‍स संदर्भात युरोपियन ग्राहकांच्‍या गरजांची पूर्तता करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आलेल्‍या ऑईल-फ्री, ऑईल-ल्‍युब्रिकेटेड कम्‍प्रेसर्स व अॅक्‍सेसरीजच्‍या त्‍यांच्‍या पोर्टफोलिओचे अनावरण केले. हॉल ४ मधील एल्‍गी स्‍टॅण्‍ड डी३१ येथे एल्‍गीच्‍या ऑईल-फ्री स्‍क्रू एअर कम्‍प्रेसरसह एकात्मिक उष्णता पुनर्प्राप्ती प्रणाली आणि सुधारित कार्यक्षमतेने युक्‍त ऑईल-ल्‍युब्रिकेटेड स्‍क्रू कम्‍प्रेसरसह नवीन स्थायी चुंबक समकालिक मोटर प्रदर्शनार्थ ठेवण्‍यात आले होते. उद्योगातील मालकीहक्‍काचा कमी खर्च व अधिक विश्‍वसनीयतेला सक्षम करणारा एल्‍गीचा पहिला टू-स्‍टेज ऑईल-ल्‍युब्रिकेटेड स्‍क्रू एअर कम्‍प्रेसर देखील प्रदशर्नामध्‍ये सादर करण्‍यात आला. 

ट्रेडशोमध्‍ये बोलताना एल्‍गी इक्विपमेण्‍ट्सचे व्‍यवस्‍थापकीय संचालक डॉ. जयराम वरदराज यांनी सांगितले, ‘‘आज हॅनोव्‍हर मेस्‍से येथे प्रदर्शनार्थ ठेवण्‍यात आलेल्‍या आमच्‍या पोर्टफोलिओमधून ऊर्जा कार्यक्षमतेमधील परिवर्तनासाठी ग्राहकांच्‍या गरजांची पूर्तता करण्‍यामध्‍ये अग्रणी भूमिका बजावण्‍याप्रती आमची कटिबद्धता दिसून येते. स्थिरता व निव्‍वळ शून्‍य कार्यसंचालनांच्‍या दिशेने प्रवासात कमी ऊर्जा वापरापासून संपूर्ण जीवन चक्र खर्च मूल्‍यांकनांपर्यंत ग्राहकांच्‍या गरजा सतत बदलत आहेत. एअर कम्‍प्रेसर्स युरोपच्‍या एकूण औद्योगिक वीज मागणीपैकी अंदाजे १० टक्‍के वीजेचा वापर करतात, तर कम्‍प्रेसरच्या जीवनचक्राच्या ७० टक्‍के खर्च कार्यसंचालनांदरम्‍यान वापरल्‍या जाणाऱ्या ऊर्जेसाठी केला जातो.  ६० वर्षांपासून आम्‍ही कम्‍प्रेस्‍ड एअर सोल्‍यूशन्‍स विकसित करण्‍याप्रती कटिबद्ध आहोत, जे दर्जात्‍मक ऊर्जा कार्यक्षमता, प्रक्रियेमधील सुधारणा, नवीन उत्‍पादने व प्रक्रियांसह मालकीहक्‍काचा एकूण खर्च कमी करण्‍यामध्‍ये योगदान देतात. तसेच, आमचे कम्‍प्रेस्‍ड एअर तज्ञ प्रत्‍येक निर्णय व कृतीमध्‍ये ग्राहकांना प्राधान्‍य देतात, ज्‍यामधून एल्‍गी कम्‍प्रेसर्सच्‍या संपूर्ण जीवनकार्यकाळ दरम्‍यान ग्राहकांना #नेहमीच चांगले अनुभवाची खात्री मिळते.’’   

    एल्‍गी कम्‍प्रेसर्स युरोपचे अध्‍यक्ष ख्रिस रिंगलस्‍टेटर म्‍हणाले, ‘‘आम्‍ही आमच्‍या युरोपियन ग्राहकांसोबत सहयोग करण्‍याप्रती कटिबद्ध आहोत. त्‍यांना ऊर्जा खर्च, कमी उत्‍सर्जनासाठी नियामक व मूल्‍य साखळी मागण्‍यांमध्‍ये होत असलेल्‍या सतत वाढीचा सामना करावा लागत आहे, तसेच कार्यसंचालन खर्चामध्‍ये, सर्वात महत्त्वाचे म्‍हणजे ऊर्जा कार्यक्षमतेत सुधारणा करण्‍याची गरज आहे. आज एल्‍गीचे कम्‍प्रेस्‍ड एअर सोल्‍यूशन्‍स विविध औद्योगिक क्षेत्रांमधील आमच्‍या युरोपियन ग्राहकांना दर्जात्‍मक ऊर्जा कार्यक्षमता देतात. आमचे कर्मचारी व चॅनेल भागीदार त्‍यांचे कौशल्‍य, अनुभव व वितरणासह ग्राहकांना त्‍यांच्‍या उत्‍पादन कार्यसंचालनांच्‍या माध्‍यमातून परिपूर्ण मन:शांती मिळण्‍याची खात्री घेतात. लक्षणीय प्रक्रिया सुधारणांमुळे ग्राहकांसाठी उत्‍पादनांची अधिक विश्‍वसनीयता आणि उद्योग-अग्रणी ग्राहक हमींची खात्री मिळाली आहे. तंत्रज्ञान व आयओटीवरील आमचे अथक लक्ष केंद्रित केल्यामुळे डिजिटाइज्‍ड कम्‍प्रेस्‍ड एअर सिस्‍टम्‍स निर्माण झाल्‍या आहेत, ज्‍या ग्राहकांना मालकीहक्‍काचा कमी खर्च देतात. आम्ही नुकतीच सुरुवात करत आहोत आणि आम्ही चांगली सुरुवात कशी केली, हे पाहण्यासारखे आहे!"


६० वर्षांपासून एल्‍गीच्‍या अग्रणी उत्‍पादनांनी आणि कम्‍प्रेस्‍ड एअर सोल्‍यूशन्‍सनी १२० हून अधिक देशांतील उद्योगांमधील उत्‍पादन, अन्‍न व पेये, बांधकाम, फार्मास्‍युटिकल्‍स व टेक्‍सटाइल्‍स अशा विविध उपयोजनांमध्‍ये सेवा दिली आहे. ४०० हून अधिक उत्‍पादनांचा पोर्टफोलिओ असण्‍यासोबत तीन खंडांमध्‍ये असलेली एल्‍गीची अत्‍याधुनिक जागतिक उत्‍पादन केंद्रे कार्बन न्‍यूट्रॅलिटी, जलसंवर्धन आणि चक्रिय कचरा व्‍यवस्‍थापनाप्रती कटिबद्ध आहेत.