पर्यावरण संवर्धनासाठी 'सक्षम-२०२३' राबवणार, राज्यभरातून विविध कार्यक्रम होणार
SANTOSH SAKPAL
April 22, 2023 11:03 PM
'सक्षम-२०२३' या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून प्रिंट मिडीयामार्फत यासंबधित जनजागृती होण्यासाठी एका स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देखिल मिळणार आहेत.
मुंबई : ऊर्जेची बचत, शाश्वत विकास आणि पर्यावरण संवर्धनासाठी 'सक्षम-२०२३ (संरक्षण क्षमता महोत्सव) हा एक महत्वाचा राष्ट्रीय कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या पुढाकारातून २४ एप्रिल २०२३ ते ८ मे २०२३ या कालावधीत 'नेट झिरो' संकल्पनेवर हा पंधरवडा देशभर साजरा करण्यात येत आहे.
सक्षम-२०२३ (संरक्षण क्षमता महोत्सव) हा एक महत्वाचा राष्ट्रीय कार्यक्रम आहे जो आपल्या देशाच्या ऊर्जा सुरक्षा, शाश्वत विकास आणि पर्यावरण संरक्षणासाठी भारत सरकारने सुरू केला आहे.
जीवाश्म इंधनावरील व्यर्थ खर्चाला आळा घालणे, परकीय तिजोरीवरील वाढते ओझे कमी करणे आणि जीवाश्म इंधनांच्या ज्वलनामुळे निर्माण झालेल्या हरितगृह वायूच्या प्रतिकूल परिणामापासून पर्यावरणाचे रक्षण करणे हे या कार्यक्रमाचे अंतिम लक्ष्य आहे.
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय तसेच तेल उद्योगाचे राज्यस्तरीय समन्वयक जनजागृती करण्यासाठी संबंधित राज्य सरकारच्या सक्रिय सहभागाने / समर्थनासह विविध उपक्रम हाती घेतात.
पेट्रोलियम संवर्धन संशोधन संघटना (PCRA) पेट्रोलियम उत्पादनांच्या संवर्धनाचे जनजागृती करण्यासाठी, इंधन-कार्यक्षम उपकरणांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि पेट्रोलियम संवर्धनाचे धोरण आणि रणनीतीचा प्रस्ताव ठेऊन, सरकारला मदत करण्यासाठी अग्रणीय आहे.
तसेच 24 एप्रिल 2023 ते 08 मे 2023 या कालावधीत ऊर्जा संरक्षण 'नेट झिरो'कडे (Energy Conservation towards 'Net Zero') च्या दिशेने ऊर्जा संरक्षण या टॅगलाइनसह सक्षम (संरक्षण क्षमता महोत्सव) 2023 चे आयोजन करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून, महाराष्ट्रातील तेल उद्योगाने 24 एप्रिल 2023 रोजी सकाळी 11:00 वाजता श्री रवींद्र चव्हाण, मंत्री PWD, अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग, महाराष्ट्र सरकार यांच्या शुभ उपस्थितीत उद्घाटन समारंभ आयोजित केला.
कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी प्रमुख पाहुणे तेल कंपन्यांनी आयोजित केलेल्या रांगोळी आणि तेल संवर्धन वर लघू नाटिका ची पाहणी करतील ज्यामध्ये शालेय विध्यार्थी सहभागी होत आहेत.
पुढील पंधरा दिवसामध्ये विविध उपक्रम राभवण्यात येत आहेत जसे की शालेय विद्यार्थ्यांसाठी समूह संभाषण/ वादविवाद, कॉलेजमध्ये भित्तीचित्र स्पर्धा, इंधन कार्यक्षम ड्रायव्हिंग स्पर्धा, लेख लेखन, पत्रकार परिषद, प्रेस विज्ञप्ति, रेडिओवरील जिंगल्स जनजागृतीसाठी प्रसारित केले जाईल
सक्षम-२०२३ दरम्यान महाराष्ट्र राज्यात 1000 पेक्षा जास्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. इंधन आणि तेल संवर्धनासाठी शालेय विद्यार्थी आणि शिक्षकांचा त्यांच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल सत्कार करण्यात येईल.
Santosh Sakpal
April 03, 2025
Santosh Sakpal
April 03, 2025
SANTOSH SAKPAL
April 03, 2025
Santosh Sakpal
March 22, 2023
SANTOSH SAKPAL
April 16, 2023
Santosh Gaikwad
April 12, 2023