अजब निषेध:अध्यक्षांनी बोलू न दिल्याने संतापले खासदार, नेपाळच्या संसदेत सर्वांसमोर काढले कपडे
Santosh Sakpal
May 10, 2023 08:58 PM
काठमांडू : सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक खासदार सर्वांसमोर कपडे काढताना दिसत आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे. ही घटना नेपाळची आहे. येथे अपक्ष खासदार अमरेश कुमार सिंह यांनी सोमवारी सर्वांसमोर कपडे काढले. सभागृहात बोलण्यासाठी वेळ दिला जात नसल्याचा आरोप त्यांनी केला.
अमरेश हे नेपाळी काँग्रेसचे माजी नेते आहेत. गतवर्षी त्यांनी सरलाहीमधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. कारण नेपाळी काँग्रेसकडून त्यांना तिकीट देण्यात आले नव्हते. दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून पीएचडी केलेल्या सिंह यांना लोकप्रतिनिधी सभागृहाचे (HoR) अध्यक्ष देवराज घिमिरे यांनी बोलू न दिल्याने आपले कपडे काढले. 'सभागृहात शांततेने वागले नाही तर कारवाई केली जाईल,' असा इशारा घिमिरे यांनी दिला होता.
कपडे काढण्याआधी काय म्हणाले?
कपडे उतरवण्यापूर्वी सिंह म्हणाले की, भ्रष्टाचाराविरोधात बोलण्यासाठी मी शहीद व्हायला तयार आहे. घिमिरे यांनी ‘संसदीय मर्यादा’ पाळण्यास सांगितले. मात्र, सिंह यांनी घिमिरे यांचे म्हणणे न ऐकता अंगावरील कपडे काढण्यास सुरुवात केली. त्यावर तेथे उपस्थित इतर खासदारांनी सिंह यांची वैद्यकीय चाचणी करावी, अशी मागणी केली. यानंतर सिंह यांनी सभागृह सोडले. नेपाळच्या संसदेत अशा प्रकारची ही पहिलीच घटना आहे.
सभागृहाचे अध्यक्ष देवराज घिमिरे यांनी खासदार अमरेश सिंह यांना संसदेची मर्यादा पाळण्याची ताकीद दिली.
नेटकऱ्यांच्या तीव्र प्रतिक्रिया
एका ऑनलाइन युझरने सांगितले की, 'प्रतिनिधी सभागृहाच्या बैठकीत स्पीकरने भ्रष्टाचारावर बोलू न दिल्याने अपक्ष खासदार अमरेश कुमार सिंह यांनी कपडे काढले.'
आणखी एका युजरने म्हटले की, 'प्रतिनिधी सभागृहाचे अध्यक्ष देवराज घिमिरे यांनी त्यांना संसदेत बोलू दिले नाही, त्यामुळे नेपाळचे खासदार अमरेश कुमार सिंह यांनी त्यांचे कपडे काढले. या घटनेच्या व्हिडिओमध्ये सिंह रागाच्या भरात शर्ट आणि बनियान काढताना दिसत आहेत.
नेपाळसंबंधित या बातम्याही वाचा...
नवनियुक्ती:नारायण प्रसाद सऊद नेपाळचे नवे परराष्ट्र मंत्री, 2014 मध्ये सुशील कोईरालांच्या सरकारमध्ये होते सिंचन मंत्री
नेपाळी काँग्रेसच्या सेंट्रल समितीचे सदस्य नारायण प्रसाद NP) सऊद नेपाळचे नवे परराष्ट्र मंत्री होतील. ते आज राष्ट्रपती भवनात आपल्या पदाची शपथ घेतील. एन पी सऊद 2014 मध्ये तत्कालीन सुशील कोईराला यांच्या सरकारमध्ये सिंचन मंत्री होते. गत दीड महिन्यांपासून पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड देशाचे परराष्ट्र मंत्रालय सांभाळत होते. येथे वाचा संपूर्ण बातमी
नेपाळचे नवे राष्ट्रपती रामचंद्र पौडेल:नेपाळी काँग्रेसला मोठे यश; सुभाष चंद्र नेमबांग यांचा पराभव
नेपाळमध्ये आज राष्ट्रपती पदासाठी निवडणुका पार पडल्या आहेत. स्थानिक वेळेनुसार सकाळी 10 पासून मतदान सुरू झाली होती. नेपाळ कॉंग्रेसचे रामचंद्र पौडेल यांचा विजय झाला असून त्यांनी CPN-UML चे उमेदवार सुभाष चंद्र नेमबांग यांचा पराभव केला. पौडेल यांना 33,802 आणि नेमबांग 15,518 मते मिळाली आहेत. पौडेल हे विद्या देवी भंडारी यांची जागा घेतली. यापुर्वी पौडेल यांनी नेपाळ संसंदेचे स्पीकरपदही भुषवले आहे.