52, Municipal Ind. Estate,
Dainik Shivner Marg,
Worli, Mumbai - 400018 (India)
मुंबई : मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच आकस्मिक निधन झालं आहे. वयाच्या 63 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने विश्वनाथ महाडेश्वर यांच निधन झालं आहे. आज दुपारी 2 वाजता वांद्रे येथे त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनसाठी ठेवण्यात येणार असून 4 वाजता अंत्ययात्रा निघेल. दुपारी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे अंत्यदर्शनाला जाणार आहेत.
महाडेश्वर हे 2002, 2007 आणि 2012 असे सलग तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले. शिक्षण समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. 2017 मध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी त्यांची निवड झाली.