मुंबई : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्री. सदानंद मोरे यांच्या हस्ते मंगळवार दिनांक ७ नोव्हेंबर २०२३ रोजी सायंकाळी ४.३० वाजता मुंबई मराठी पत्रकार संघात दिवाळी अंकांच्या प्रदर्शनाचा शुभारंभ होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वि. वाबळे असतील.
मुंबई मराठी पत्रकार संघात दरवर्षी दिवाळी अंकांचे प्रदर्शन आयोजित केले जाते. यावर्षी मंगळवार, दि. ७ नोव्हेंबर ते शनिवार, दि. ११ नोव्हेंबर २०२३ पर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले असेल. प्रदर्शनाची वेळ सकाळी ११.०० ते सायंकाळी ७.०० अशी असेल.
यावर्षीच्या प्रदर्शनात ऋतुरंग, कालनिर्णय, चंद्रकांत, लोकमत, हेमांगी, गृहलक्ष्मी, अॅग्रोवन, धनंजय, हंस, अन्नपूर्णा आदी विविध वाचनीय व दर्जेदार अंक पहावयास मिळतील. साहित्य रसिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे करण्यात आले आहे.