मुंबई : जगभरात मेटाची सेवा बंद पडली आहे. त्यामुळे फेसबूक, इन्स्टाग्रामसह मेटाचे सर्व अॅप्लिकेशन्स आणि सोशल मीडिया साईट्स बंद आहेत. भारतातही अनेक शहरात फेसबुक आणि इन्स्टाग्राम बंद पडलं आहे.
भारतात रात्री नऊ वाजल्यापासून मेटाची सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. नेटीझन्स फेसबूक आणि इन्स्टाग्राम बंद असल्याची तक्रार करत आहेत. एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मसह सर्वत्र याबाबत चर्चा पाहायला मिळत आहे. लोक वेबसाईट आणि अपवर लॉगईन करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि तिथे त्यांना एरर येत आहे. तसंच त्यांना पोस्ट्स दिसत नाहीयेत. Pजगातील अनेक देशांना याचा फटका पडला आहे.
भारतातही अनेक शहरात फेसबुक आणि इन्स्टाग्राम बंद पडलं आहे. सोशल मीडियावरील लाखो युजर्स याबाबतीत तक्रार करत आहेत.