BJP आमदाराच्या गोळीबाराचा VIDEO:गणपत गायकवाड यांनी शांतपणे खुर्चीत बसलेल्या शिंदे गटाच्या नेत्याला घातल्या गोळ्या; गायकवाडसह तिघांना 14 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी
Santosh Sakpal
February 03, 2024 09:35 PM
CCTV फुटेजद्वारे सत्य सर्वांसमोर:पोलिस योग्य ती कारवाई करतील अशी अपेक्षा; गोळीबार प्रकरणात खासदार श्रीकांत शिंदे यांचे विधान
भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेच्या सत्ताधारी शिंदे गटाच्या नेत्यावर केलेल्या गोळीबारामुळे एकच खळबळ माजली आहे. आता या घटनेचे एक सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियात व्हायरल झाले आहे. त्यात गणपत गायकवाड हे शिंदे गटाच्या महेश गायकवाड यांच्यावर खुलेआमपणे गोळीबार केल्याचे दिसून येत आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे गणपत गायकवाड यांनी आपण स्वसंरक्षणार्थ गोळीबार केल्याचा दावा केला होता. पण या फुटेजमुळे त्यांचा हा दावा निखालस खोटा असल्याचे स्पष्ट होत आहे.
गणपत गायकवाड यांनी शुक्रवारी रात्री उल्हासनगरच्या हिल पोलिस ठाण्यात शिंदे गटाचे कल्याण पूर्व विभागाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. या प्रकरमी पोलिसांनी गणपत गायकवाड यांच्यासह 3 जणांना अटक केली आहे. जमिनीचा वाद व आपसातील वैमनस्यातून ही घटना घडल्याचा दावा केला जात आहे. सध्या महेश गायकवाड यांच्यावर ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिथे त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.
घटनेचा व्हिडिओ व्हायरल
गोळीबाराच्या या घटनेचा एक व्हिडिओ आता सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यात भाजप आमदार गणपत गायकवाड शांतपणे खुर्चीत बसलेल्या महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार करताना दिसून येत आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, गायकवाड यांनी एकूण 7 गोळ्या झाडल्या. त्यापैकी 6 गोळ्या महेश यांना लागल्या. भयंकर म्हणजे गणपत गायकवाड व्हिडिओत गोळीबार केल्यानंतरही थांबताना दिसत नाहीत. ते गोळ्या लागल्यानंतर खाली महेश यांना जवळ जावून बेदम मारहाण करतानाही दिसून येत आहेत.
व्हिडिओत गोळीबाराचा आवाज ऐकून पोलिस अधिकारी धावत घटनास्थळी येतानाही दिसून येत आहेत. तर त्यावेळी तिथे उपस्थित असणारी इतर मंडळी पळून जाताना दिसत आहे. दुसरीकडे, या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी दुपारी ज्युपिटर रुग्णालयात जाऊन महेश शिंदे यांच्या प्रकृतीची माहिती घेतली. डॉक्टरांच्या माहितीनुसार, महेश गायकवाड यांची प्रकृती चिंताजनक असून, ते व्हेंटिलेटरवर आहेत. त्यांच्या शरीरातून 6 गोळ्या बाहेर काढण्यात आल्या आहेत.
काय म्हणाले गणपत गायकवाड?
दुसरीकडे, भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी आपल्याला या कृत्याचा कोणताही पश्चाताप नसल्याचे स्पष्ट केले आहे. या प्रकरणी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर अनेक गंभीर आरोपही केलेत. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रात गुन्हेगारांचे राज्य घडवत आहेत. ते मुख्यमंत्री असतील तर महाराष्ट्रात केवळ गुन्हेगारच पैदा होतील. शिंदे यांनी आमच्यासारख्या चांगल्या माणसाला आज गुन्हेगार बनवले. मनस्ताप झाल्यामुळे मी ही फायरिंग केली. या कृत्याचा मला कोणताही पश्चाताप नाही. कारण माझ्यासमोर माझ्या मुलाला पोलिस स्टेशनमध्ये धक्काबुक्की करत असतील तर मी काय करणार? पोलिसांच्या धाडसामुळे महेश गायकवाड वाचला. पोलिसांनी धाडस करून मला पकडले. मी महेश गायकवाडला जीवे मारणार नव्हतो. पण माझ्या आत्मसंरक्षणासाठी मला हे करावे लागले.
CCTV फुटेजद्वारे सत्य सर्वांसमोर:पोलिस योग्य ती कारवाई करतील अशी अपेक्षा; गोळीबार प्रकरणात खासदार श्रीकांत शिंदे यांचे विधान
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांनी महेश गायकवाड व राहुल पाटील यांची ज्युपीटर रुग्णालयात जाऊन तब्येतीची विचारपूस केली. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाच्या शहराध्यक्षांवर गोळीबार केला. त्यानंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापलेले आहे.
शिंदे पिता-पुत्रांनी जखमी झालेल्या महेश गायकवाड व राहुल पाटील यांची भेट घेतल्यानंतर खासदार श्रीकांत शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, कालपासून आम्ही सर्व लोक या ठिकाणी आहोत. राहुल पाटील आणि महेश गायकवाड यांच्यावर हल्ला झाला. त्यानंतर ज्युपीटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सहा गोळ्या बाहेर काढल्या गेल्या
खा. श्रीकांत शिंदे म्हणाले की, महेश गायकवाड यांच्यावर डॉक्टरांनी सहा तास सर्जरी चालली. त्याच्यामध्ये महेश गायकवाड यांच्यावर फायर झालेल्या सहाही गोळ्या बाहेर काढण्यात आलेल्या आहेत. आता महेश गायकवाड यांना आयसीयूमध्ये असून त्यांची प्रकृती अजून गंभीर आहे. राहुल पाटील यांच्यावर देखील दोन गोळ्या झाडल्या. त्याच्याही गोळ्या काढल्या आहेत. दोघेही सुखरुप बाहेर पडतील यासाठी काय जे करता येईल, यासाठी डॉक्टरांना सूचना देण्यात आलेल्या आहेत.
कोण काय म्हणते, त्याला महत्त्व नाही
दरम्यान, दुसरी बाब म्हणजे, कोणी काय केले. कसे घडले याबाबत विचारण्यात काहीही अर्थ नाही. जे काही आहे ते लोकांसमोर आलेले आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून जनतेला सर्व कळालेले आहे. त्यामुळे पोलिसाकडून चौकशी करत आहेत. यावर जास्त बोलण्यासारखे काहीच नाही. कोण काय म्हणते, त्यात काही म्हणण्यासारखे नाही. जे कोणी यात जबाबदार असतील त्यांच्यावर पोलिसांकडून कारवाई होईल, अशी अपेक्षा आम्हाला पोलिसांकडून आहे.
भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी उल्हासनगर पोलिस ठाण्यात केलेल्या गोळीबारामुळे एकच खळबळ माजली आहे. या गोळीबारात शिंदे सेनेचे माजी नगरसेवक महेश गायकवाड हे गंभीर जखमी झालेत. त्यांच्यावर ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
भाजप आमदार गणपत गायकवाडसह तिघांना 14 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी; न्यायालयाचे आदेश
शिंदे सेनेचे माजी नगरसेवक महेश गायकवाड हे गंभीर जखमी झालेत. त्यांच्यावर ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुसरीकडे पोलिसांनी आमदार गणपत गायकवाड यांच्यासह तिघांना अटक केली असून त्यांना कोर्टासमोर सादर केले आहे. याप्रकरणी कोर्टाने तिघांना 11 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे 14 फेब्रुवारीपर्यंत या तिघांची पोलिस कोठडीत चौकशी होणार आहे.
सुनावणीदरम्यान काय झालं?
न्यायाधीश ए.ए निकम यांच्या बेंचसमोर ही सुनावणी घेण्यात आली. गणपत गायकवाड यांनी गोळीबार केला असल्याची माहिती यावेळी पोलिसांनी कोर्टात दिली. त्यानंतर गणपत गायकवाड यांची बंदूक पोलिसांकडून जप्त करण्यात आली. तसेच या प्रकरणात आम्हाला सखोल चौकशी करायची असून फरार आरोपींचा देखील आम्हाला शोध घ्यायचा आहे, असंही पोलिसांनी कोर्टात सांगितलं. पोलिसांनी 14 दिवसांची पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी पोलिसांनी केली, त्यानंतर कोर्टाने त्यांचा निकाल हा राखून ठेवला होता. पण आता गणपत गायकवाड यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.
घटनेचं सीसीटीव्ही समोर
हिललाईन पोलीस स्टेशनमध्ये आमदार गणपत गायकवाड महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यासह इतरांसोबत होते. या दोन्ही गटात आधी बसून सुरू असलेल्या चर्चेत अचानक वातावरण तापलं आणि आमदार गणपत गायकवाड यांनी थेट पिस्तुल काढून गोळीबाराला सुरूवात केली. महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांना या गोळीबारात गोळ्या लागल्या. गोळीबाराचा आवाज ऐकल्यावर तातडीने एका पोलिसाने आत धाव घेतली. मात्र तोवर आमदार गायकवाड हे महेश गायकवाडला मारहाण करत होते. त्यांना रोखण्याचा पोलीस कर्मचाऱ्याने प्रयत्न केला. त्याचवेळी दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांनीही आत धाव घेतली. दोन्ही कार्यकर्त्यांची एकमेकांशी तुंबळ हाणामारी झाली. एकमेकांवर खुर्च्या उचलून कार्यकर्त्यांची हाणामारी झाली.
कोर्टाने परवानगी नाकारली
सुरक्षेच्या कारणाने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आमदार गायकवाड व त्यांच्या साथीदारांना न्यायालय़ात सादर केले जावे, अशी मागणी पोलिसांनी केली होती. परंतु, कोर्टाने त्यांची मागणी मान्य केली नाही. अखेर त्यांना कोर्टात सादर करावे लागले. पोलिसांकडून 15 दिवसांची पोलिस कोठडी मागितली जात आहे. तर त्यांना कमीत कमी पोलिस कोठडी दिली जावी, अशी मागणी आरोपींच्या वकीलांकडून केली जात आहे. या 14 फेब्रुवारी पर्यंत पोलिस कोठडी