फिनिक्स मार्केटसिटीमध्ये GLIDA तर्फे EV चार्जिंग हबचे अनावरण

Santosh Sakpal April 19, 2025 06:51 AM

मुंबई  : फिनिक्स मार्केटसिटी मुंबईने आज GLIDA हे चार्जिंग हब लॉन्च केल्याची घोषणा केली आहे, शाश्वत गतिशीलतेत हे एक मोठे पाऊल असून प्रगतीच्या दिशेने जाणारे मुंबईतील सर्वात मोठ्या EV चार्जिंग गंतव्यस्थानांपैकी हे चार्जिंग स्टेशन महत्वाचे ठरले आहे. मुंबईच्या सर्वोत्तम शॉपिंग डेस्टिनेशनमध्ये उत्कृष्ट असलेली ही मजबूत पायाभूत सुविधा 50 हाय-स्पीड DC चार्जर्ससह वैशिष्ट्यीकृत आहे, ज्यामध्ये अत्याधुनिक डायनॅमिक लोड-शेअरिंग तंत्रज्ञानासह 200 kW अल्ट्रा-फास्ट चार्जर उपलब्ध आहे.


या प्रारंभिक उपक्रमामूळे अप्रतिम कार्यक्षमता, कमी प्रतीक्षा वेळ आणि एकाचवेळी अधिक वाहनांना सेवा देण्याची क्षमता प्रदान करून शहरी EV चार्जिंग अनुभवाला पुन्हा परिभाषित केले आहे. नवे तंत्रज्ञान आणि वापरकर्त्याच्या सोयीसाठी डिझाइन केलेला GLIDA चार्जिंग हब मुंबईच्या आर्थिक राजधानीत वाढणाऱ्या इलेक्ट्रिक गतिशीलतेला समर्थन देण्यासाठी सज्ज आहे.


हरित उपक्रमांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करीत GLIDA, EV पायाभूत सुविधांमध्ये मान्यताप्राप्त कंपन्यांची भागीदारी केली आहे, जेणेकरून शाश्वत गतिशीलता सर्वांसाठी अधिक सुलभ होईल. या चार्जिंग हबचे उद्घाटन फिनलंडच्या वाणिज्यदूतांच्या उपस्थितीत करण्यात आले, या द्वारे आंतरराष्ट्रीय सहकार्याचे प्रतीक आणि स्वच्छ उर्जेसाठी सामायिक बांधिलकी जपण्यात आली आहे.


GLIDA चे कार्यकारी संचालक, श्री अवधेश कुमार झा म्हणाले कि , "फिनिक्स मार्केटसिटी, मुंबई येथे आमच्या चार्जिंग हबचे अनावरण हे भारतात मजबूत आणि विश्वासार्ह EV चार्जिंग नेटवर्क तयार करण्याच्या आमच्या उद्दिष्टाच्या दिशेने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. प्रगत तंत्रज्ञान आणि शाश्वत पद्धतींचा समावेश करून, आम्ही उद्योगासाठी नवीन मापदंड स्थापित करत आहोत आणि EV वापरकर्त्यांना सर्वोत्तम चार्जिंग अनुभव प्रदान करत आहोत."


द फिनिक्स मिल्स लिमिटेडचे मार्केटिंग (पश्चिम आणि उत्तर) आणि वरिष्ठ उपाध्यक्ष आणि श्री. मयंक लालपुरीया यावेळी म्हणाले कि, “आम्हाला GLIDA, युरोपमधील अग्रगण्य स्वच्छ ऊर्जा प्रवर्तक यांच्याशी सहकार्य करण्याचा अभिमान आहे, त्यामुळे फिनिक्स मार्केटसिटी मुंबई येथे सर्वसमावेशक आणि भविष्यासाठी तयार EV चार्जिंग हब सादर करता येईल. हा उपक्रम केवळ मूल्यवर्धित सेवा नाही - तर हे आमच्या शाश्वत, भविष्य-केंद्रित रिटेल परिसंस्था आकारण्यासाठी बांधिलकीचे प्रतिबिंब आहे. ग्राहकांच्या पसंती, जीवनशैली आणि स्वच्छ गतिशीलतेकडे विकसित होत असताना, आम्हाला विश्वास आहे की ही प्रगती ग्राहकांच्या अनुभवाला लक्षणीयरीत्या उंचावेल आणि उद्देश आणि नवकल्पना यांसह आघाडीच्या गंतव्यस्थान म्हणून आमच्या या ठिकाणाला बळकटी देईल.”


हा उपक्रम जबाबदारिपूर्वक शहरी विकासात योगदान देत असताना अभ्यागतांच्या अनुभवाला आणखी चांगला अनुभव प्रदान करणार आहे. GLIDA चार्जिंग हबच्या उदघाटनासह EV चार्जिंग आता मुंबईच्या सर्वात लोकप्रिय जीवनशैली म्हणून ओळखलंय जाणाऱ्या फिनिक्सला भेट देण्याचे आणखी एक कारण आहे. या ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञान हे जीवनशैलीशी मिळतेजुळते असून भविष्यकालीन सुबकरित्या निर्माण केलेले वातावरणात आहे.