परत कधीच गोव्याला येणार नाही”, पर्यटकाने सोशल मीडियावर शेअर केला गोव्यातील भयावह अनुभव

Santosh Sakpal April 01, 2025 11:35 PM

गोवा ;  समुद्र किनारे, उत्सव, सण आणि हिंदू व पोर्तुगीज संस्कृतीसाठी ओळखले जाणारे गोवा जगभरातील पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. पण गेल्या काही वर्षांत घडलेल्या बऱ्या वाईट घटनांमुळे गोव्याबाबत बरेच गैरसमजही परसरत असल्याचे पाहायला मिळत आहेत. अशात आता एका पर्यटकाने रेडिट या सोशल मीडिया साइटवर त्याला आलेला वाईट अनुभव शेअर केला आहे. याचबरोबर रेडिटवरील पोस्टमध्ये या पर्यटकाने पुन्हा कधीही गोव्याला येणार नसल्याचेही म्हटले आहे.

रेडिटवर लिहिलेल्या पोस्टमध्ये या पर्यटकाने अनेक गंभीर दावे केले आहेत. त्याच्या पोस्टनुसार, त्याला शिवीगाळ, मारहाण आणि स्थानिकांचा त्रास सहन करावा लागला.

हा पर्यटक म्हणाला, “मी यावेळी मी माझ्या मैत्रिणीसोबत गोव्याला गेलो होतो. कडक उन्हाळा आहे त्यामुळे आम्ही स्कूटी ऐवजी चारचाकी गाडी भाड्याने घेतली. परत जाताना, मी तिला विमानतळावर सोडले आणि मी माझी रेल्वे पकडण्यासाठी मडगावला निघालो. या दरम्यान दुचाकीवरील दोन स्थानिकांनी मी त्यांच्या गाडीला धक्का दिल्याचा आरोप केला. पण त्यांच्या गाडील मी कोणत्याही प्रकारे धक्का दिला नव्हता.”

त्यांनी माझा पाठलाग केला

या पर्यटकाने आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हटेले, “या लोकांनी माझा रेल्वे स्टेशनपर्यंत पाठलाग केला, त्याची गाडी अडवली आणि गाडीच्या खिडकीची काच फोडण्याची धमकी दिली. मी खिडकी उघडताच त्याने मला मुक्का मारला. त्याचा दुसरा मित्र हे पाहतच उभा होता. मी बाहेरून आलो असल्याने त्यांनी मला शिवीगाळ आणि मारहाण केली.”

स्थानिकांचा हस्तक्षेप

“दरम्यान हा प्रकार लक्षात येताच काही स्थानिकांनी हस्तक्षेप केला आणि माझी सुटका केली. पण, त्यानंतर मी भाड्याची गाडी परत करून वेळेत रेल्वे पकडू नाही. हे इतके भयानक होते की, मी अद्याप यातून सावरलो नाही. यामुळे मला आता गोव्याबद्दल राग येत आहे. त्यामुळे इथून पुढे कधीही गोव्याला येणार नाही.”

Got physically abused in Goa, will probably never come back
byu/generic-_name inGoa

मला वाटत नाही की मी आता पुन्हा

दरम्यान या पर्यटकाच्या भयावह अनुभवावर एका युजरने प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला, “मी खूप निराश झालो आहे. मला माझ्या कॉलेजच्या दिवसांपासून गोवा आवडतो. मी दर दोन वर्षांनी एकदा गोव्याला जातो. मी २०२३ मध्ये शेवटचे गोव्याला गेलो होतो. त्यावेळी खूप मजा आली होती. पण, तेव्हापासून परिस्थिती खरोखरच इतकी वाईट झाली आहे का? मी गोव्याबद्दल जे काही ऐकत आहे त्यावरून, मला वाटत नाही की मी आता पुन्हा गोव्याला जाईन.”