गोदरेज लॉक्स ने मुंबईतील ४०० घरांमध्ये घराच्या सुरक्षेबद्दल जागृती निर्माण केली

SANTOSH SAKPAL April 23, 2023 05:13 PM

मुंबई :  ‘गोदरेज लॉक्स’ने गृह सुरक्षा दिवसाच्या (१५ नोव्हेंबर) दरम्यान हाती घेतलेल्या ‘लिव्ह सेफ, लिव्ह फ्री’ कार्यक्रमांतर्गत घराच्या सुरक्षिततेच्या दिशेने एक सक्रिय पाऊल उचलले आहे, ज्याचा उद्देश सर्व ५२ ठिकाणी मोफत घर सुरक्षा तपासणी प्रदान करणे आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून, ब्रॅंडने मुंबईतील दादर येथे एक सुरक्षा बूथ स्थापित केले आणि लोकांना देखभाल, घरच्या सुरक्षिततेचे मूल्यांकन आणि चोरी प्रतिबंधात्मक उपाय यावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करून दिले. ब्रॅंडच्या मार्फत एक सुरक्षा तज्ज्ञ आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक, दादर पोलिस स्टेशन, श्री. विजय गणपत नाईक यांनी लोकांना घरच्या सुरक्षिततेचे महत्व समजावून सांगितले आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण केले.