गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स महाराष्ट्रात सादर करत आहे गोदरेज मॅजिक फ्लोअर क्लीनर - परवडणारे आणि टिकाऊ असे रेडी टू मिक्स फ्लोअर क्लीनर
Santosh Sakpal
June 12, 2023 11:25 PM
• किंमत प्रति सॅशे फक्त ४० रुपये. नेहमीच्या फ्लोअर क्लीनर्सच्या किमतीतच
• या नवीन रेडी टू मिक्स प्रकाराने महाराष्ट्रातील फ्लोअर क्लीनर्सच्या किंमतीमध्ये अंदाजे एक तृतीयांशाची घट
• फिनाईलच्या किमतीत उत्कृष्ट जंतुनाशक फ्लोर क्लीनरचे संरक्षण प्रदान
• शाश्वत आणि पर्यावरणास अनुकूल स्वरूप
मुंबई,: ‘पूटिंग प्लॅनेट बिफोर प्रॉफिट’ या आपल्या मूल्याच्या अनुषंगाने गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (GCPL) ने गोदरेज मॅजिक फ्लोअर क्लीनर या परवडणाऱ्या आणि टिकाऊ अशा वैशिष्ट्यपूर्ण रेडी-टू-मिक्स फ्लोअर क्लीनरचे अनावरण केले. हे उत्पादन केवळ महाराष्ट्रासाठी सादर करण्यात आले असून १५०० कोटी रुपयांच्या फ्लोअर क्लिनर श्रेणीमध्ये क्रांती घडवून आणण्यासाठी सज्ज आहे.
गोदरेज मॅजिक फ्लोर क्लीनर हा भारतातील सर्वात स्वस्त आणि शाश्वत उपाय आहे. रेडी-टू-मिक्स फ्लोअर क्लीनर ५५ रुपये किमतीच्या सुलभ कॉम्बी पॅकमध्ये (बाटली + रिफिल) आणि स्वतंत्रपणे रिफिल ४० रुपये किमतीत उपलब्ध आहे. या नाविन्यपूर्ण, अनोख्या उत्पादनामुळे महाराष्ट्रातील फ्लोअर क्लीनर्सच्या किंमतीमध्ये अंदाजे एक तृतीयांशाची घट झाली आहे. गोदरेज मॅजिक फ्लोअर क्लीनर फिनाइलच्या किमतीत उत्कृष्ट जंतुनाशक फ्लोर क्लीनरचे संरक्षण प्रदान करते.
फक्त एका लहान सॅशेतून आपण ५०० मिलीलीटर फ्लोअर क्लिनरची बाटली तयार करू शकतो. महाराष्ट्रातील घरांसाठी हा परवडणारा पर्याय आहे. वापरण्यासाठी बाटलीमध्ये जेलच्या सॅशेची सामग्री घालून पाणी घातले की फ्लोअर क्लिनर तयार. स्थानिक फिनाइलशी तुलना करता अनेक स्थानिक पर्यायांना मागे टाकून मॅजिक फ्लोर क्लीनर प्रभावी ९९.९% जंतू संरक्षण आणि उत्कृष्ट स्वच्छता प्रदान करते.
या सादरीकरणावर भाष्य करताना गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडचे भारताचे मुख्य विपणन अधिकारी अश्विन मूर्ती म्हणाले, “या नवीन उत्पादनाचे वैशिष्ट्यपूर्ण रेडी-टू-मिक्स स्वरूप केवळ प्लास्टिकचा वापर कमी करत नाही तर ग्राहकांच्या वाढत्या गरजा देखील पूर्ण करते. रेडी-टू-मिक्स स्वरूप असलेल्या उत्पादनासह फ्लोअर क्लिनर श्रेणीमध्ये क्रांती घडवून आणणारे गोदरेज मॅजिक फ्लोअर क्लीनर सादर करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. आमच्या नावीन्यपूर्ण दृष्टिकोनाचा लाभ घेत आणि महाराष्ट्रातील ग्राहकांच्या गरजा खोलवर समजून घेऊन आम्ही एक सर्वोत्तम उत्पादन सादर करत असल्याचा आम्हाला विश्वास आहे. हे उत्पादन केवळ स्वच्छता आणि जंतूविरोधात संरक्षणाचे सर्वोच्च मापदंड पार करते एवढेच नाही तर ग्राहकांना परवडणाऱ्या आणि शाश्वत जीवनशैली विषयक गरजेशीही ते सुसंगत आहे.”
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानुसार, राज्यात आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये ३११,२५४ टन प्लास्टिक निर्माण झाले. गोदरेज मॅजिक फ्लोअर क्लीनर प्लॅस्टिक कचरा तसेच ऊर्जेचा वापर कमी करून पर्यावरणाच्या समस्यांचे निराकरण करते. सर्वसाधारण फ्लोअर क्लीनरच्या तुलनेत, याला पॅकेजिंगमध्ये ९४% कमी प्लास्टिक आणि ७२% कमी कागदाची आवश्यकता असते. शिवाय, त्याचे सुटसुटीत जेल-आधारित सॅशे कार्यक्षम वाहतुकीस चालना देतात. परिणामी ८३% कमी इंधन वापर आणि म्हणूनच नियमित फ्लोअर क्लीनरच्या वाहतुकीच्या तुलनेत ८३% कमी कार्बन उत्सर्जन होते. या स्वरूपामुळे प्रति ट्रक ५.८५ पट अधिक सॅशे युनिट्सची वाहतूक करता येते. हे उत्पादन प्रत्येक व्यक्तीला तिच्या दैनंदिन जीवनात पर्यावरणाच्या जाणीवपूर्वक निवडी करण्याचे सामर्थ्य देते. पुनर्वापराला प्रोत्साहन देऊन आणि अपव्यय कमी करून मॅजिक फ्लोअर क्लीनरचे रेडी-टू-मिक्स स्वरूप पर्यावरण रक्षणामध्ये लक्षणीय योगदान देते.