आंतरराष्ट्रीय क्रिकेट चॅम्पियनशिपचा भव्य शुभारंभ !
Santosh Gaikwad
August 26, 2024 06:28 PM
मुंबई :आंतरराष्ट्रीय क्रिकेट चॅम्पियनशिपचा( टेनिस बॉल) भव्य शुभारंभ जुहू येथील सन एन सँड हॉटेलमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट चॅम्पियनशिपचा उद्घाटन सोहळा पार पडला.
यावेळी अनेक मान्यवर व पत्रकार प्रतिनिधी उपस्थित होते. विशेष अतिथी म्हणून पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांची पुतणी राष्ट्रीय मार्गदर्शक सोनल प्रल्हाद मोदी होत्या. प्रमुख पाहुणे डॉ. गोरक्ष धोत्रे राष्ट्रीय अध्यक्ष- ऑल इंडिया मीडिया वर्कर्स असोसिएशन आणि एम .डी इंटरनॅशनलच्या संस्थापक, बॉलीवूडच्या सर्वात तरुण चित्रपट निर्मात्या मनीषा राणावत होते.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट चॅम्पियनशिप स्पर्धेत 8 देश सहभागी होणार आहेत. चॅम्पियनशिप जानेवारी 2025 मध्ये मुंबईत होणार आहे. समारंभात भारतीय क्रिकेट बॅशचा शुभारंभही करण्यात आला. ही लीग आयपीएलच्या फॉरमॅटवर आयोजित केली जाईल. प्रख्यात ब्रँड भारतातील प्रमुख शहरांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पुरुष आणि महिला संघांचे मालक असेल. भारतीय क्रिकेट बॅशमधील सर्वोत्तम 30 खेळाडूंची राष्ट्रीय शिबिरासाठी निवड केली जाईल. या शिबिरातून १५ खेळाडू निवडले जातील जे आंतरराष्ट्रीय क्रिकेट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाचे प्रतिनिधित्व करतील.
संरक्षक चंद्रू वाधवा, अध्यक्ष नीरज धीर, सरचिटणीस पियाली सिंगरॉय, सल्लागार चिरायुष पटेल, कार्यकारिणी सदस्य अजय भसीन, कार्यकारिणी सदस्य सुरेश वावेकर, कार्यकारिणी सदस्य मनोज जगताप, सल्लागार अभिजीत, समन्वयक अंशुल छाजड आणि सहयोगी हरिकेश जैस्वाल यांचा समावेश आहे.
या कार्यक्रमात 'मैं वही हूं' या अनोख्या संकल्पनेचा टीझर लाँच करण्यात आला ज्यामध्ये भगवान श्री कृष्ण त्यांची कथा कथन करताना दाखवण्यात आले आहेत. ग्लोबस इव्हेंट्सचे अध्यक्ष सचिन शेळके, ग्लोबस इव्हेंट्सचे सह-संस्थापक सोनल बच्छाव, लेखक विवेक आपटे, दिग्दर्शक रघुवीर कुलकर्णी, निर्माता प्रशांत फुलवणे व समीर पोतदार यांनी ही संकल्पना आखली आहे. हे संगीत नाटक म्हणून भारतात आणि जगभरात सादर केले जाईल.
फिटनेस उद्योजक गजेंद्र राजपुरोहित, उद्योजक निलेश निकम, संतन, लेखक दिग्दर्शक साहिल अशा अनेक उद्योजक, खेळाडू यांनीही या कार्यक्रमाला उपस्थिती लावली.