नोटनदास रियाल्टीच्या ‘नोटन एज’ प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा संपन्न

Santosh Sakpal January 13, 2025 10:39 PM

नोटनदास रियाल्टीच्या ‘नोटन एज’ प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा संपन्न
जुहूमधील अनोख्या ट्रॅपेजॉइडल आर्किटेक्चर आणि अपराजेय बाजारपेठ मूल्य असलेल्या लक्झरी कमर्शियल प्रोजेक्टची नवी सुरुवात
मुंबई, ११ जानेवारी २०२४ : नोटनदास रियाल्टीने आज आपल्या भव्य आणि लक्झरी कमर्शियल प्रोजेक्ट ‘नोटन एज’ च्या भूमिपूजन सोहळ्याच्या माध्यमातून जुहूच्या व्यवसायिक विश्वात नवा अध्याय सुरू केला आहे. नाविन्य आणि शाश्वतता यांच्या मूलभूत तत्वांवर आधारित हा प्रकल्प अत्याधुनिक पायाभूत सुविधा, पर्यावरणपूरक वैशिष्ट्ये आणि आधुनिक सोयीसुविधांचा परिपूर्ण संगम प्रदान करेल. व्यवसायिक क्षेत्रात नवे मापदंड स्थापित करणारा हा प्रकल्प अत्यंत प्राइम लोकेशनमध्ये असणार आहे. आजचा भूमिपूजन सोहळा हा नोटनदास रियाल्टीसाठी एक महत्त्वाचा टप्पा असून, यामुळे प्रकल्पाच्या प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झाली आहे.
जुहूमधील प्रमुख ठिकाणी वसलेल्या ‘नोटन एज’ प्रकल्पात अत्याधुनिक डिझाईन, २०० वाहनांसाठी यांत्रिक पार्किंग सिस्टम आणि पर्यावरणपूरक पायाभूत सुविधा समाविष्ट आहेत. या प्रकल्पामध्ये डबल-ग्लेझ्ड विंडोज सारखी ऊर्जा-कार्यक्षम वैशिष्ट्ये समाविष्ट करण्यात आली आहेत, जी कार्बन फूटप्रिंट कमी करत ऊर्जा बचतीस प्रोत्साहन देतील.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाविषयी बोलताना नोटनदास रियाल्टीचे व्यवस्थापकीय संचालक हर्ष जगवानी म्हणाले, “नोटन एजच्या माध्यमातून आम्ही जुहूमध्ये जागतिक दर्जाचा व्यावसायिक प्रकल्प साकारत आहोत. जुहूमध्ये व्यावसायिक जागांची कमतरता असूनही, या प्रकल्पाच्या माध्यमातून आम्ही एक उत्कृष्ट संधी उपलब्ध करून देत आहोत. हा प्रकल्प केवळ आमच्या गुणवत्तेच्या वचनबद्धतेचा पुरावा नाही, तर प्रीमियम ऑफिस आणि रिटेल स्पेसच्या वाढत्या मागणीचे प्रतीक आहे. आमची दृष्टी एक असे भव्य लँडमार्क उभे करण्याची आहे, जे डिझाईन, फंक्शनॅलिटी आणि शाश्वततेच्या दृष्टीने वेगळे ठरेल. या प्रकल्पाचे ट्रॅपेजॉइडल आर्किटेक्चर त्याच्या अनोख्या डिझाईन आणि बाजारपेठेतील अपीलला अधिक अधोरेखित करते.”
ते पुढे म्हणाले, “सध्या जुहूच्या व्यावसायिक स्थावर मालमत्ता बाजारपेठेत मोठी स्पर्धा आहे आणि नव्या प्रकल्पांची संख्या अत्यल्प आहे. अशा परिस्थितीत, नोटनदास रियाल्टी ही जुहूमध्ये दोन व्यावसायिक प्रकल्प निर्माण करणारी एकमेव कंपनी आहे, ज्यामध्ये ‘नोटन एज’ समाविष्ट आहे. २४ ते ३० महिन्यांच्या बांधकाम कालावधीत, ‘नोटन एज’ हा जुहूमधील एक प्रतिष्ठित व्यावसायिक केंद्र म्हणून उदयास येईल. याशिवाय, जून महिन्यात आम्ही दोन निवासी प्रकल्प लाँच करणार आहोत, तसेच बांद्रामध्ये आणखी काही प्रकल्पांची घोषणा लवकरच करण्यात येणार आहे. यामुळे लक्झरी स्थावर मालमत्ता क्षेत्रातील आमची स्थिती आणखी भक्कम होईल.”
‘नोटन एज’ सुमारे १.५ लाख चौरस फूट क्षेत्रात उभारला जाणार असून, मोठ्या फ्लोअर प्लेट्ससह प्रीमियम व्यवसायिक ब्रँड्स, एफ अँड बी आणि रिटेल स्पेसेससाठी आकर्षक संधी उपलब्ध करून देणार आहे. हा प्रकल्प व्यापार आणि व्यवसायासाठी एक महत्त्वाचे केंद्र बनण्याचा संकल्प घेत आहे.
‘नोटन एज’ची खासियत म्हणजे त्यातील अत्याधुनिक यांत्रिक पार्किंग व्यवस्था, प्रशस्त फ्लोअर प्लेट्स आणि उच्चस्तरीय रिटेल व एफ अँड बी स्पेसेस, ज्यामुळे हा जुहूमधील सर्वात अनोखा व्यावसायिक केंद्र बनेल. पर्यावरणपूरक डबल-ग्लेझ्ड खिडक्या आणि शाश्वत बांधकाम साहित्याचा वापर करून कमी ऊर्जा वापरास चालना दिली जाईल, ज्यामुळे भाडेकरूंना दीर्घकालीन खर्च बचतीचा लाभ मिळेल. प्रकल्पाची प्रमुख लोकेशन उत्तम कनेक्टिव्हिटी प्रदान करत असून, सुव्यवस्थित इंटिरियर्स आणि अत्याधुनिक सुविधा आदर्श व्यावसायिक वातावरण निर्माण करतात.
नोटनदास रियाल्टी विषयी:
नोटनदास रियाल्टी अत्याधुनिक तंत्रज्ञान, वैशिष्ट्यपूर्ण डिझाईन आणि उच्च प्रतीच्या बांधकामासह प्रकल्प साकारण्यास वचनबद्ध आहे. पारदर्शकता आणि प्रभावी प्रोजेक्ट व्यवस्थापनावर भर देत, कंपनी नेहमीच वेळेत आणि दर्जेदार जागा वितरीत करण्यावर लक्ष केंद्रित करते. प्रत्येक प्रकल्प उत्कृष्टतेच्या दिशेने वाटचाल करत आधुनिक ट्रेंड्स आणि उद्योगातील नवकल्पनांसह साकारला जातो. नोटनदास रियाल्टी सतत नाविन्यपूर्ण जागा विकसित करून स्थावर मालमत्ता क्षेत्रात नवे मानदंड प्रस्थापित करत आहे.