प्रोटीअनचा ब्रँड ॲम्बेसेडर असलेल्या पंकज त्रिपाठीकडून ऐका महत्त्वाकांक्षी भारताची गोष्ट

Santosh Sakpal January 24, 2025 11:32 AM

डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चरचा नागरिकांच्या जीवनावर होत असलेल्या परिणामाचा जाहीरनामा म्हणजे हा चित्रपट 

हे कथानक पंकजच्या रिअल आयुष्याने प्रेरित आहे. सुरुवातीला साध्या व्यक्तिरेखा साकारत थेट व्यवसायाच्या शिखरावर पोहोचणे 

अनेक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि सोशल मीडियाच्या व्हायरलचा फायदा घेण्यासाठी ही मोहीम डिजिटल-फर्स्ट म्हणून डिझाइन केली गेली आहे


मुंबई, : डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर (DPI) मधील आघाडीची कंपनी आणि नावीन्यपूर्ण नागरिक-केंद्रित ई-गव्हर्नन्स सोल्यूशन्स विकसित करण्यात आघाडीची कंपनी प्रोटीअन ईजीओव्ही टेक्नॉलॉजीज लि. NSDL eGov ते Protean अशी संस्थेची नवीन ओळख निर्माण करण्याच्या मार्गावर आहे. नुकतीच त्यांनी त्यांची नवीन ब्रँड मोहीम – अपनी कहानी का हीरो लाँच केली आहे. DPI नागरिकांचे जीवन कसे उंचावते हे दाखवण्यासाठी ब्रँडने भारतातील सामान्य माणसाचे प्रतीक असलेल्या पंकज त्रिपाठी यांची यासाठी निवड केली आहे. 

या चित्रपटाचे कथानक म्हणजे स्वप्ने पूर्ण करण्यासाठी दररोजच्या असंख्य अडथळ्यांवर मात करणाऱ्या आणि आकांक्षा तसेच आशावादाने भरलेल्या 1.45 अब्ज नायकांना वाहिलेली आदरांजली आहे. असे केल्याने ते त्यांच्या स्वतःच्याच जीवनकथेचे नायक बनतात. या कथांमध्ये प्रोटीअन ची भूमिका महत्त्वाची आहे. कारण त्याच्या टॅगलाइनमध्ये म्हटल्याप्रमाणे – ‘प्रोटीअन: इम्पॅक्टिंग एव्हरीवन, एव्हरी डे’. (प्रोटीअन प्रत्येकाच्या दररोजच्या आयुष्यावर परिणाम करते.)

या चित्रपटाबद्दल प्रोटीअन ईजीओव्ही टेक्नॉलॉजीज लिमिटेडचे ​​मुख्य वाढ आणि विपणन अधिकारी श्री. गौरव रामदेव म्हणाले, “डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर ही एक तांत्रिक संकल्पना आहे जी काहींना समजते आणि ते त्याला जोदून घेऊ शकतात. मात्र, गोष्ट सांगताना त्याला त्या साच्यात बसवणे आवश्यक असते. DPI हे राष्ट्राचे सक्षमीकरण आणि अब्जावधी आकांक्षा पूर्ण करणारे आहे. या क्षेत्रातील आघाडीची कंपनी म्हणून, केवळ BFSI आणि स्टार्टअप उद्योगावरच नव्हे तर या देशातील अशा श्रेणीतील प्रत्येक नागरिकावर प्रभाव टाकणाऱ्या प्रेरणा देणाऱ्या मानवी कथा सांगणे ही आमची जबाबदारी आहे. हाच प्रभाव आम्हाला आमच्या मोहिमेद्वारे हायलाइट करायचा होता जो प्रोटीअन पुनर्बांधणीचा पुढचा भाग आहे. यासाठी श्री. पंकज त्रिपाठी यांच्यापेक्षा अधिक चांगला कोणीही आमचा निवेदक असेल असा विचारही आम्ही करू शकत नाही, कारण ते आधी आमचे ग्राहक आणि आता आमचे ब्रँड ॲम्बेसेडर आहेत. आम्हाला खात्री आहे की, हा चित्रपट लाखो प्रेक्षकांना त्यांच्या स्वतःच्या कथांचा नायक बनण्यासाठी प्रेरणा देईल.”

सुरेश सेठी, एमडी आणि सीईओ, प्रोटीअन ईजीओव्ही टेक्नॉलॉजीज लिमिटेड’’म्हणाले, “आजच्या विकसित डिजिटल जगामध्ये, भारताच्या डिजिटल क्षेत्रातील वाढ ही  डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर (DPI) च्या विकासाद्वारे स्पष्टपणे दिसून येते, जी आम्ही आता जगासोबत शेअर करत आहोत. DPI चे मुख्य समावेशक तत्त्व असे सांगते की, देशाच्या सर्वात दुर्गम कोपऱ्यातीलही प्रत्येक नागरिकाला इतर सर्वांप्रमाणेच संधी आहे. याच माध्यमातून DPI ने सामाजिक आणि आर्थिक एकत्रीकरणामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे, जी सामाजिक-आर्थिक परिवर्तनासाठी निर्णायक आहे. Protean eGov डीपीआय स्पेसमध्ये आघाडीवर आहे, आम्ही नेहमीच मागच्या फळीत काम करतो. आमची गोष्ट सांगण्याची ही मोहीम म्हणजे उत्तम संधी आहे. या कथेचे नेतृत्व करण्यासाठी पंकज त्रिपाठीसारखा बहुमुखी आणि प्रतिभावान अभिनेता मिळाल्याचा आम्हाला आनंद आहे.”   

ओगिल्वी द्वारे संकल्पित आणि विकसित केलेला, "अपनी कहानी का हीरो" हा हलके - फुलके संवाद आणि नॉस्टॅल्जिक क्षणांचा परिपाक आहे. चित्रपटातील त्यांच्या अनुभवाविषयी बोलताना, सुजॉय रॉय, सीनियर कार्यकारी क्रिएटिव्ह डायरेक्टर, ओगिल्वी म्हणाले, “तंत्रज्ञान ही उत्तम शक्ती आहे. अत्यावश्यक सेवा आणि त्यांची आत्यंतिक गरज असलेल्या लोकांमधील दरी कमी करत आहे. पंकज त्रिपाठी यांचा समावेश असलेला हा नवीन चित्रपट, प्रोटीअन चे डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर सोल्यूशन्स—उदा. पॅन कार्ड, नॅशनल पेन्शन सिस्टीम, डिजिटल कॉमर्ससाठी ओपन नेटवर्क - हे देशभरातील जीवन कसे बदलत आहेत याचे सुंदर चित्रण करते. पंकजच्या प्रवासातून, आम्हाला डिजिटल सशक्तीकरणाची खरी शक्ती दिसते, ज्यामुळे महत्त्वाच्या सेवा प्रत्येकासाठी सुलभ, सुरक्षित आणि प्रभावी बनतात. एजन्सी या नात्याने प्रोटीअन ला हे क्षण निर्माण करण्यासाठी मदत करण्यात आणि आकर्षक कथनाच्या रूपात सर्वांसाठी अधिक समावेशक भविष्यासाठी योगदान देण्यात आम्हाला अभिमान वाटतो.”

अभिनेते पंकज त्रिपाठी म्हणाले, “जेव्हा मला या मोहिमेबद्दल सांगण्यात आले तेव्हा मला डीपीआय म्हणजे काय याबद्दल उत्सुकता होती, परंतु जेव्हा मला त्याची माहिती मिळाली, आणि त्याचा आपल्या जीवनावर काय परिणाम होतो हे समजले तेव्हा मी आश्चर्यचकित झालो. रोजच्या जीवनात वापर करूनही खरं तर आपल्याला या गोष्टी फारशा कळत नाहीत. प्रोटीअन चा एक ग्राहक म्हणून, त्यांच्या कथेचा एक भाग बनल्याचा मला आनंद आहे.”

कनिका भारद्वाज, पीपल ॲज ब्रँड्स - पीएबीच्या सीईओ, ज्यांनी या संघटनेची रचना केली, त्या सांगतात, “आम्ही केवळ ब्रँडलाच फायदेशीर नव्हे तर प्रेक्षकांनाही भावेल अशा गोष्टी तयार करण्यासाठी वचनबद्ध आहोत. पंकजचा खरेपणा आणि प्रोटीअन च्या नावीन्यपूर्णतेमधला हा ताळमेळ गेम चेंजर होण्याचे वचन देतो आणि आयुष्याचा हा दृष्टीकोन प्रेक्षकांसमोर समोर आणल्याचा आम्हाला आनंद आहे."

3 मिनिटे 50 सेकंदांचा हा चित्रपट पंकजच्या निवेदनाने पुढे जातो. एका सामान्य भारतीयाच्या जीवनातील महत्त्वाच्या क्षणांतून तो प्रेक्षकांना घेऊन जातो, सुरुवात साधीच पण स्वप्ने मोठी! खऱ्या आयुष्यातील असंख्य नायकांसाठी मार्ग मोकळा करणाऱ्या प्रोटीअन उत्पादनांचे परिवर्तनात्मक समर्थन आणि प्रभाव या चित्रपटात चित्रित केले आहे. प्रोटीअन विद्यासारथी (शिष्यवृत्ती), प्रोटीअन पॅन, eKYC, NPS, ONDC आणि ProteanLife अशी काही गोष्टींची माहिती यात दिली आहे.

कंपनीच्या यापूर्वीच्या #ChangeIsGrowth मोहिमेचे उद्दिष्ट एनएसडीएल ई-जीओव्हीकडून पुनर्ब्रँडिंग केल्यानंतर कंपनीला पुन्हा नव्याने सादर करणे हे होते. यावेळी, ब्रँडने स्वतःला भारतीय जनतेसाठी आवश्यक डिजिटल भागीदार म्हणून स्थान देण्याचा पर्याय निवडला आहे, त्यांच्या विविध गरजा आणि आकांक्षा, शिक्षण आणि वित्त ते जीवनशैली अशा सर्वसमावेशक उपायांची ऑफर दिली आहे. प्रोटीअन चे डिजिटल सोल्यूशन्स एखाद्याच्या जीवन प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावर कसा सकारात्मक प्रभाव पाडू शकतात हे दाखवून, वैयक्तिक स्तरावर ग्राहकांशी संवाद साधण्याचे या चित्रपटाचे उद्दिष्ट आहे. 

ही जाहिरात पाहण्यासाठी येथे भेट द्या: https://youtu.be/aJOUhOMo05I?si=BM5XEqHiAg5iOn9E