कल्याण डोंबिवलीत जोरदास पाऊस, ठाणे, पालघरसह कोकणात अलर्ट जारी
Santosh Gaikwad
June 20, 2024 01:02 PM
मुंबई : राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळत आहेत. काही भागात जोरदार पावसामुळं जनजीवन विस्कळीत देखील झाल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, अनेक ठिकाणी अद्याप चांगला पाऊस झालेला नाही. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुढचे तीन ते चार तास राज्यातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, पुढील 3 ते 4 तासात राज्यातील विविध भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. यामध्ये पालघर, ठाणे, रायगड आणि मुंबई जिल्ह्यांतील काही ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, वर्तवण्यात आली आहे. मुंबईत पहाटेपासूनच पावसाची रिमझिम पाहायला मिळत आहे.कल्याण डोंबिवली परिसरातही जोरदार पाऊस पडत आहेण् मुंबईसह पालघर, ठाणे, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या भागात मुंबईच्या हवामान खात्यानं यलो अलर्ट जारी केलाय. विदर्भातही आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, विविध भागात राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.
राज्यात सध्या काही ठिकाणी पावसाचा जोर कमी झाला आहे. ज्या शेतकरी बांधवांनी पेरणी योग्य पाऊस झालेला नसतानाही पेरणीचा निर्णय घेतला होता, त्यांचा जीव आता टांगणीला लागला आहे.