एचपीने केले, आजच्या संमिश्र कार्यपद्धतीसाठी, स्मार्ट एक्सेसरीजचे, अनावरण
Santosh Sakpal
June 12, 2023 10:43 PM
जगातील पहिला ४५ इंची सुपर अल्ट्रावाइड ड्युएल क्यूएचडी कर्व्ह्ड डिसप्ले, स्वयंचलित ब्राइटनेस नियंत्रणासह
ठळक वैशिष्ट्ये
● वापरकर्त्याला कोठूनही, कोणत्याही वेळी स्पष्टपणे स्ट्रीमिंग शक्य करून देणारा ९६० फोरके वेबकॅम एआय क्षमतांसह
● अखंडित अनुभवासाठी अॅक्टिव नॉइज कॅन्सलेशन (गोंगाट नाहीसा करण्याची) सुविधा आणि टचस्क्रीन केसने युक्त असलेले पोली व्हॉयेजर फ्री ६० यूसी इअरबड्स
● सुलभ वापराच्या दृष्टीने, सुट्या करण्याजोग्या रिस्ट रेस्टसह, ९२५ एर्गोनॉमिक दंडाकार माउस
● एचपीशिवाय अन्य नोट्सबुक्सनाही अनुकूल असा नवीन एचपी थंडरबोल्ट जी४ डॉक
नवी दिल्ली, जून ० ७, २०२३ – संमिश्र कार्यपद्धतीच्या गरजा पूर्ण करणाऱ्या अॅक्सेसरीजच्या श्रेणीचे अनावरण एचपीने आज भारतात केले. ह्यांमध्ये पोली व्होयेजर फ्री ६० यूसी इअरबड्स, ९६० फोरके वेबकॅम, ४५ इंची कर्व्ह्ड मॉनिटर, ९२५ एर्गोनॉमिक दंडाकार माउस आणि थंडरबोल्ट जी४ डॉकचा समावेश आहे. ह्या अॅक्सेसरीज उपभोक्त्यांच्या सातत्याने उत्क्रांत होत जाणाऱ्या जीवनशैलीसाठी व त्यांच्या प्रवासाच्या वैविध्यपूर्ण आवश्यकतांसाठी, उपयुक्त आहेत.
संमिश्र कार्यस्थळे व कार्यशैलींमध्ये कामाचा अधिक चांगला अनुभव व अखंडित समन्वय ह्यांसाठी उपभोक्त्यांना तंत्रज्ञानाची गरज भासते. त्यांची उत्पादनक्षमता व कार्यक्षमता वाढवू शकतील अशी अधिक स्मार्ट साधने व उत्पादने त्यांना लांगतात. विशेषत: व्हिडिओ कॉल्स, श्राव्य साधनांतील स्पष्टता, बहुकार्यात्मक क्षमता आणि खात्रीशीर कनेक्टिविटीसाठी तंत्रज्ञानाची गरज भासते. आधुनिक ग्राहकांच्या ह्या आवश्यकता पूर्ण करण्याच्या दृष्टीनेच एचपीने स्मार्ट अॅक्सेसरींचा नवीन पोर्टफोलिओ विकसित केला आहे.
एचपी इंडियाच्या पर्सनल सिस्टम्स विभागाचे वरिष्ठ संचालक विक्रम बेदी म्हणाले, “कामाच्या गरजा गेल्या काही वर्षांत लक्षणीयरित्या बदलल्या आहेत. संमिश्र कार्यपद्धतीची गरज, समन्वय व सुरक्षिततेची गरज ह्यांमुळे हे बदल झाले आहेत. एचपीमध्ये आम्ही कार्यपद्धतीच्या बदलत्या गरजांची पूर्तता करण्याच्या दृष्टीने नवोन्मेषाकारी काम करतो आणि नवीन ऑडिओ, व्हिडिओ व समन्वय अॅक्सेसरीजच्या नवीन श्रेणी विकसित करतो. ह्या उत्पादनांमुळे उत्पादनक्षमता वाढते आणि घरून किंवा प्रवासात कोठूनही काम करताना एक अखंडित संमिश्र कार्यसंस्कृती अनुभवणे शक्य होते.”
पोली व्होयेजर फ्री ६०
वापरकर्त्यांना उत्पादनक्षम, जोडलेले राहता येईल आणि स्वत:चे मनोरंजनही करून घेता येईल अशा दृष्टीने पोली व्होयेजर फ्री ६० यूसी इअरबड्सचे डिझाइन करण्यात आले आहे. प्रत्येक बडमध्ये एक तीन मिक्सची मालिका आहे. त्यामुळे बोलणाऱ्याचा आवाज त्रिकोणात विभागला जातो आणि भवतालचा गोंगाट किमान स्तरावर राखला जाऊन संवादात स्पष्टता येते. संमिश्र (हायब्रिड) आणि समायोजनशील अॅक्टिव नॉइज कॅन्सलिंग (एएनसी) तंत्रज्ञानाची आणि गोंगाट कमी करणाऱ्या प्रगत अल्गोरिदम्सची जोड दिल्यामुळे कॉलच्या दोन्ही बाजूंना आवाज अत्यंत स्पष्ट राहील ह्याची निश्चिती होते. हे इअरबड्स शंकूच्या आकाराच्या ३ आकारमानांच्या इअर टिप्समध्ये येतात. त्यामुळे ते दिवसभर कोणत्याही त्रासाशिवाय वापरले जाऊ शकतात. टचस्क्रीन चार्ज केसमुळे बॅटरी दीर्घकाळ टिकते, कॉलची माहितीही डिसप्ले होते. त्यामुळे वापरकर्त्याचे ह्या अनुभवावर सहज नियंत्रण राहू शकते. वेगवेगळी इनपुट उपकरणे अखंडितपणे वापरली जाऊ शकतात. हे इअरबड्स भक्कम बॅटरी शक्तीसह तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे हे वापरून सलग २४ तास ऐकता येऊ शकते आणि १६.५ तास बोलता येऊ शकते.
एचपी ई४५सी ४५ इंची कर्व्ह्ड मॉनिटर
एचपीचा पूर्णपणे नवीन ४५ इंची कर्व्ह्ड मॉनिटर हा वापरकर्त्याच्या सोयीच्या दृष्टीने घडवण्यात आला आहे. त्याची रचना अनन्यसाधारण असून, संमिश्र कार्यपद्धतीसाठी तो अत्यंत स्थितीस्थापक आहे. हा इमर्सिव ४५ इंची तिरपा, ड्यूअल क्यूएचडी तसेच १५००आरमध्ये वक्र असा मॉनिटर आहे. ह्याचा रिफ्रेश दर १६५ हर्ट्झ असून त्यामुळे दृश्यानुभव अधिक विस्तृत होते आणि बघण्याचा कोनही अधिक आरामदायी होऊ शकतो. संमिश्र कार्यसंस्कृतीच्या दृष्टीने तयार करण्यात आलेल्या ह्या मॉनिटरच्या ड्युअल डिस्प्लेमुळे वापरकर्त्यांला २ वेगवेगळे कम्प्युटर्स एकाच वेळी जोडून घेता येतात आणि एका वेळी अनेक कामे अखंडितपणे करता येतात. हा मॉनिटर एकात्मिक दुहेरी साइड-फायरिंग स्पीकर्ससह तयार करण्यात आला आहे. त्यामुळे अतिरिक्त केबल्स किंवा बाह्य स्पीकर्स न लावताही अत्यंत सुस्पष्ट श्राव्यानुभव मिळतो. हा मॉनिटर अनेक कनेक्टिविटी क्षमतांनी सुसज्ज आहे. त्यामुळे वापरकर्त्याला अत्यंत सुविहितपणे काम करणे शक्य होते.
एचपी ९६० फोरके स्ट्रीमिंग वेबकॅम
एचपीच्या नवीन एआय-सुधारित वेबकॅमच्या फोरके रिझोल्युशनमुळे वापरकर्ते त्यांची सर्वांत अस्सल प्रतिमा स्ट्रीम करू शकतात. वेबकॅम वापरकर्त्यांना त्यांची पार्श्वभूमी बदलण्याची मुभा देतो तसेच लाइव्ह स्ट्रीम्सदरम्यान ऑटो फ्रेमिंग करत राहतो. तो स्वयंचलित कलर करेक्शन आणि एचडीआरमध्येही मदत करतो आणि दिवसा किंवा रात्री कधीही अत्यंत जिवंत असा काँटेण्ट देतो. १८ मिलीमीटरच्या एफ२.० विशाल लेन्स टप्प्यात येणारी कोणतीही बाब टिपून तिची उत्कृष्ट प्रतिमा दाखवते. अगदी कमी प्रकाशातही वेबकॅम उत्तम कामगिरी करतो. ड्युअल मायक्रोफोन्सने युक्त असा हा वेबकॅम नको असलेला आवाज कमी करण्यातही मदत करतो.
एचपी ९२५ एर्गोनॉमिक व्हर्टिकल माउस
एचपी ९२५ एर्गोनॉमिक दंडात्मक माउस हा, क्लिक, ड्रॅग किंवा स्क्रोल करताना, वापरकर्त्याचा हात अधिक शिथिल, नैसर्गिक स्थितीत राहावा ह्या दृष्टीने डिझाइन करण्यात आला आहे. ह्या माउससोबत सुटी करता येण्याजोगी रिस्ट रेस्ट दिली जाते. ह्यामुळे हाताची हालचाल विनासायास करता येते. डेस्कटॉपपासून लॅपटॉप, टॅब्लेटपर्यंत तीन उपकरणांना हा एर्गोनॉमिक माउस एचपी युनिफायिंग डाँगल किंवा ब्ल्यूटूथ ५.३ वापरून, एकाच वेळी जोडून ठेवता येतो. मल्टि-ओएस सपोर्ट म्हणजेच विंडोज, अॅपल व क्रोम उपकरणांमधील स्थित्यंतर हा माउस सुरळीतपणे करू शकतो. त्याचबरोबर ह्या माउसची बॅटरी ६ महिने टिकते आणि अखंडित अनुभवाची निश्चिती करण्यासाठी तो पाच कस्टमाइझ करण्याजोग्या बटनांनी सुसज्ज आहे.
एचपी थंडरबोल्ट डॉक
एचपी थंडरबोल्ट डॉकमुळे वापरकर्ते त्यांच्या यूएसबी-सी एनेबल्ड नोटबुकचा विस्तार डिसप्ले, उपकरणे व वायर्ड नेटवर्कपर्यंत करू शकतात. वैश्विक अनुकूलतेच्या दृष्टीने डिझाइन करण्यात आलेला हा डॉक एचपीशिवाय अन्य नोटबुक्ससोबतही काम करतो. त्याची ऊर्जा १०० वॉट्सपर्यंत आहे. डॉकमुळे वापरकर्त्यांना कमाल तीन डिसप्लेजची भर घालणे शक्य होते आणि केवळ एका केबलचा वापर करून नोटबुकला जोडून घेता येते.
किंमत आणि उपलब्धता
● पोली व्होयेजर फ्री ६० यूसी इअरबड्स कार्बन ब्लॅक व व्हाइट सॅण्ड अशा दोन रंगांत उपलब्ध आहेत आणि त्यांची किंमत ४१,९९९ रुपयांपासून सुरू होते.
● एचपी ई४५सी ४५ इंची कर्व्ह्ड मॉनिटर १२,६६,२१ रुपये एवढ्या प्रारंभिक किमतीला उपलब्ध आहे.
● एचपी ९६० फोरके स्ट्रीमिंग वेबकॅमची किंमत १८,९९९ रुपयांपासून सुरू होते.
● एचपी ९२५ एर्गोनॉमिक व्हर्टिकल माउस जून २०२३पासून ८, ९९९ रुपये प्रारंभिक किमतीला उपलब्ध होणार आहे.
● एचपी थंडरबोल्ट यूएसबी-सी डॉक जी४ची १९,५०० रुपये किमतीपासून उपलब्ध आहे.