हल्दिया पेट्रोकेमिकल्स लिमिटेड (एचपीएल) ही फिनोलिक्स साखळीतील भारताची पहिली इंटिग्रेटेड कंपनी बनण्याच्या मार्गावर

Santosh Sakpal October 12, 2023 09:02 PM

कोलकाता: : हल्दिया पेट्रोकेमिकल्स लिमिटेड (एचपीएल) कंपनीने विस्ताराची योजना आखली असून पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याचे निश्चित केले आहे. या प्रोजेक्टनंतर एचपीएल ही फिनोलिक्स साखळीतील भारताची पहिली इंटिग्रेटेड कंपनी बनण्याच्या मार्गावर आहे.

एचपीएल कंपनीची कथा यशापयशाची आहे. 2014 मध्ये ही कंपनी तात्पुरती बंद झाली, परंतु व्यवस्थापनाच्या मालकीतील बदलामुळे नेत्रदीपक बदल घडवून आले. द चॅटर्जी ग्रुपच्या (टीसीजी) स्टीवर्डशिप अंतर्गत एचपीएलने तिची आर्थिक स्थिती मजबूत केली. शिवाय कंपनीच्या ऑपरेशन्समध्ये नवीन प्रदेश (टेरिटरी) आणि उत्पादन लाइन्समध्ये विविधता आणली. त्यात व्यापार, विशेष रसायने आणि इंधन किरकोळ विक्रीचा समावेश केला आहे. या उल्लेखनीय बदलांमुळे एचपीएल कंपनीने 1,300 हून अधिक प्रोसेसिंग युनिट्सचे अस्तित्व सुनिश्चित केले गेले आहे. ज्याने पूर्व विभागातील पॉलिमर प्रक्रिया क्षेत्रात 10 लाखांहून अधिक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी कायम ठेवल्या आहेत. शिवाय, एचपीएल ही राज्य आणि केंद्र सरकारच्या तिजोरीसाठी एक महत्त्वपूर्ण महसूल गोळा करून देणारी एक प्रमुख कंपनी बनली आहे.

एचपीएल कंपनी भारतातील पहिला ऑन-पर्पज प्रोपीलीन प्लांट ऑलेफीन कन्व्हर्जन टेक्नॉलॉजीवर (ओसीटी) आधारित आणि भारतातील सर्वात मोठा फिनोल प्रकल्प पश्‍चिम बंगाल येथील हल्दिया येथे उभारत आहे. त्यामुळे ही कंपनी फिनोलिक्स साखळीतील भारताची पहिली इंटिग्रेटेड कंपनी बनण्याच्या मार्गावर
एचपीएल ही कंपनी देशव्यापी उच्च मागणी असलेल्या विशेष रसायनांच्या (केमिकल्स) विशिष्ट विभागात आघाडीवर राहण्यासाठी उत्सुक आहे. विशेष रसायनांमुळे कंपनीला 2023 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीमध्ये 999 कोटी रुपयांचा महसूल मिळवण्यात मदत झाली आहे.

या व्यतिरिक्त, एचपीएल कंपनी 300 केटीपीए फिनॉल आणि 185 केटीपीए असेटोन क्षमतेसह देशातील सर्वात मोठा फिनॉल प्लांट उभारत आहे. हा प्रकल्प वेगाने कार्यान्वित केला जात आहे. “सदर प्लांट्स कार्यान्वित झाल्यामुळे एकूण रासायनिक व्यवसाय पोर्टफोलिओमध्ये अतिरिक्त 5 हजार कोटी रुपयांनी वाढ होण्याची अपेक्षा आहे. 2026 आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीपर्यंत पूर्ण करण्याचे टार्गेट आहे,” असे हल्दिया पेट्रोकेमिकल्स लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी नवनीत नारायण यांनी सांगितले.

लोकसंख्येचा मोठा आधार, अनुकूल लोकसंख्याशास्त्र, वाढती आर्थिक वाढ, शहरीकरण आणि ऑटोमोबाईल उत्पादन, बांधकाम, पायाभूत सुविधा, कृषी रसायने आणि फार्मास्युटिकल्सवर त्याचा सकारात्मक परिणाम यामुळे पॉलिमर आणि इतर रसायनांची मागणी वाढत आहे. ही प्रस्तावित गुंतवणूक पश्चिम बंगालमधील रासायनिक क्षेत्रातील गेल्या दोन दशकांतील सर्वात मोठी असेल. त्यामुळे सहायक युनिट्सची संख्याही वाढली आहे.
योजना जसजशा पूर्ण होण्याच्या दिशेने वाटचाल करत जातील, तसतसे डिजिटायझेशनसारख्या क्षेत्रात प्रगती होईल. यामुळे डाउनस्ट्रीम केमिकल उद्योगात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होतील.

केमिकल्सभोवती विकसित होणारी एकूण औद्योगिक परिस्थिती फार कमी कालावधीत मोठ्या प्रमाणात वाढणार आहे," असे नारायण पुढे म्हणाले.