आयसीआयसीआय लोम्बार्डच्या कॉर्पोरेट इंडिया रिस्क इंडेक्स 2022 अहवाल जाहीर
Santosh Sakpal
April 25, 2023 07:06 PM
जागतिक आव्हानांसमोर भारतीय कंपन्यांच्या लवचिक कामगिरीवर शिक्कामोर्तब
मुंबई : जागतिक पातळीवर आकुंचित झालेली आर्थिक धोरणे, वाढलेला चलनवाढ दर, मंदावलेली जागतिक वाढ आणि अन्नधान्यांच्या वाढलेल्या किंमती यासारखे अनेक आव्हाने समोर उभी ठाकलेली असताना भारत सरकार आणि भारतीय कंपन्यांनी कार्यक्षम अशा जोखीम व्यवस्थापन धोरणांचा अवलंब करत आपली लवचिकता जगाला दाखवून दिली आहे. भारताबाबतची ही गुणवैशिष्ट्ये कॉर्पोरेट इंडिया रिस्क इंडेक्स (सिरी) 2022 च्या तृतीय अहवालात ठळकपणे प्रकाशझोतात आली आहेत. फ्रॉस्ट अॅण्ड सुलीव्हॅनच्या सहकार्याने आयसीआयसीआय लोम्बार्डने हा अभ्यास अहवाल तयार केला असून 2021 मध्ये 62 गुंणांकावर असलेला जोखीम निर्देशांक (रिस्क इंडेक्स) 2022 मध्ये 63 गुणांकावर आला आहे. जनरल इन्शुरन्स क्षेत्रातील भारतातील आघाडीची कंपनी असलेली आयसीआयसीआय लोम्बार्ड ही भारतीय कंपन्यांसाठी प्रथमच अशा स्वरुपाचा निर्देशांक तयार करणे तसेच आणि इंडिया रिस्क मॅनेजमेंट अवॉर्ड्स (IRMA) सारखी संकल्पना मांडणारी आद्यप्रवर्तक कंपनी ठरली आहे. रिस्क इडेक्स आणि IRMA पुरस्कार हे कंपन्यांसाठी जोखीम हाताळणी व्यवस्थापनाचे मुल्यमापन करणारे मापदंड ठरले आहेत.
आयसीआयसीआय लोम्बार्डच्या सिरी 2022 अहवालात सहा पातऴ्यांवरील 32 जोखीम घटकांचा समावेश करण्यात आलेला असून जागतिक पातळीवर जोखीम व्यवस्थापानासाठी अवलंबिल्या जाणाऱ्या पध्दतींचा विचार करण्यात आलेला आहे. अधिक गुंणाक हे कंपनीचे उत्तम जोखीम व्यवस्थापन प्रकट करते ज्याद्वारे कंपन्यांना कार्यक्षम आणि प्रभावशाली जोखीम व्यवस्थापन पध्दतींचा स्वीकार करण्यास प्रोत्साहन आणि पाठबळ देते. आयसीआयसीआय लोम्बार्डचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ भार्गव दासगुप्ता आणि फ्रॉस्ट अॅण्ड सुलीव्हॅनचे जागतिक अध्यक्ष अरुप झुत्शी यांनी सिरी 2022 च्या अहवालाच्या प्रकाशनप्रसंगी सविस्तर माहिती दिली. जोखीम व्यवस्थापनात अतुलनीय कामगिरी बजावलेल्या बड्या आणि मध्यम आकाराच्या उद्योगक्षेत्रातील सुमारे अडीचशपेक्षा अधिक कंपन्याना इंडिया रिस्क मॅनेजमेंट पुरस्काराच्या नवव्या वार्षिक सोहळ्याप्रसंगी आयसीआयसीआय लोम्बार्डने सन्मानित केले आहे. रिस्क इंडेक्समधील वाढता गुणांक भारतीय कंपन्यांची जोखीम व्यवस्थापनातील उत्तम कामगिरी दर्शविते प्रमुख घटकांची तुलना 2022,2021,2020 कॉर्पोरेट इंडिया रिस्क इंडेक्स 63, 62, 57 कॉर्पोरेट इंडिया रिस्क मॅनेजमेंट 66,65,64 कॉर्पोरेट इंडिया रिस्क एक्पोजर 64, 62, 66
अहवाल प्रकाशनप्रसंगी बोलताना आयसीआयसीआय लोम्बार्डचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ भार्गव दासगुप्ता म्हणाले की, आयसीआयसीआय लोम्बार्डचा कॉर्पोरेट जोखीम निर्देशांक अहवाल कंपन्यांना त्यांच्या जोखीम ढाच्याचे मूल्यांकन आणि व्यवस्थापन करण्यासाठी आवश्यक असलेली अंतर्दृष्टी आणि साधने प्रदान करतो. त्याचबरोबर कंपन्यांना दीर्घकालीन प्रतिकूल परिस्थितीत दिशा दाखविण्यासाठी आणि शाश्वत वाढ साध्य करण्यासाठी आणखी सक्षम करतो. कॉर्पोरेट रिस्क इंडेक्सच्या या तिसर्या आवृत्तीतील वर्धित गुणांक हा भारतीय कॉर्पोरेट्सनी जागतिक पातळीवरील तयार झालेले अडथळे आणि आव्हानांना तोंड देताना अवलंबलेल्या कार्यक्षम जोखीम व्यवस्थापन पद्धतींचा सबळ पुरावा आहे. त्याचबरोबर भावी वाटचाल करताना कंपन्यांनी जोखीम वक्रतेच्या पुढे टिकून राहणे आणि सर्वसमावेशक व कार्यक्षम जोखीम व्यवस्थापन पद्धतींचा अवलंब करणे अतिशय महत्वाचे आहे.
फ्रॉस्ट अॅण्ड सुलीव्हॅनचे जागतिक अध्यक्ष अरुप झुत्शी याप्रसंगी म्हणाले की, कॉर्पोरेट इंडिया रिस्क इंडेक्स स्कोअरमध्ये प्रत्येक वर्षी सातत्याने होत असलेल्या सुधारणेत भारताच्या आर्थिक कथेची ताकद दडलेली आहे. दूरसंचार आणि दळणवळण, एरोस्पेस आणि संरक्षण आणि शिक्षण तसेच कौशल्य विकास यासारख्या मोठ्या संख्येने उद्योग क्षेत्रे चांगल्या जोखीम निर्देशांकाकडे जाताना आपणाला दिसत आहेत. त्याचबरोबर हे देखील दिसून आले आहे की, मोठ्या आणि मध्यम आकाराचे भारतीय उद्योग अधिकाधिक लवचिक होत आहेत. तसेच हे उद्योग भौगोलिक-राजकीय समस्यांमुळे उद्भवणाऱ्या बाजार आणि अर्थव्यवस्था आणि कार्यप्रणालीबाबतच्या जोखीम हस्तांतरित करत आपली परिपक्वता दाखवून देत आहेत. यातून सतत बदलणाऱ्या जोखीमपूर्ण जगात आपले हित सुरक्षित ठेवत भारताची सक्षम वाटचाल दिसून येत आहे.
2022 रिस्क इंडेक्समध्ये सर्व 20 क्षेत्रे ‘सर्वोत्तम’ किंवा ‘अत्तुत्तम जोखीम हाताळणी’ श्रेणीमध्ये दिसतात आणि त्यातील ऑटोमोटिव्ह, एफएमसीजी, पर्यटन, आरोग्यसेवा, दूरसंचार, फार्मास्युटिकल्स आणि न्यू एज यासह सात उद्योग क्षेत्र ‘सर्वोत्तम’ जोखीम हाताळणी दाखवून देतात. ‘एरोस्पेस आणि डिफेन्स’ क्षेत्राने जोखीम निर्देशांकात सर्वाधिक सुधारणा दर्शविलेली आहे. या क्षेत्राने 2021 मध्ये 52 वरून 2022 मध्ये 63 गुणाकंनावर झेप घेतली आहे आणि त्यामागील मुख्य कारण म्हणजे सरकार आणि व्यावसायिक पातळीवर करण्यात आलेले नवीन आविष्कार हे होय. पारंपारिक क्षेत्रे आता सायबर धोके आणि नावीन्यपूर्ण जोखीम यासारख्या तांत्रिक जोखमींसाठी देखील तयारी करत आहेत. पर्यटन व आदरातिथ्य आणि वाहतूक आणि लॉजिस्टिक यासारख्या क्षेत्रांनी इंधन दरवाढ आणि दहशतवादामुळे उद्भवलेल्या व्यत्ययांचा प्रभावीपणे सामना केला आहे. तथापि, धातू आणि खाणकाम आणि रसायन व पेट्रोकेमिकल क्षेत्रांनी अर्थव्यवस्थेथी संबंधित बाह्य आर्थिक घटकांमुळे जोखीम व्यवस्थापन करण्यात काही अंशी घट दर्शविलेली आहे.