मोदी सत्तेवर आल्यास उध्दव ठाकरेंसह बडे नेते जेलमध्ये जाणार : अरविंद केजरीवाल

Santosh Gaikwad May 11, 2024 09:23 PM


 नवी दिल्ली : नरेंद्र मोदी सत्तेत आल्यास उद्धव ठाकरे यांच्यासह बडे नेते जेलमध्ये जाणार असा खळबळजनक दावा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.  अंतरिम जामीन मिळाल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पक्ष कार्यालयात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पहिलं भाषण केलं आहे. यावेळी  अरविंद केजरीवाल यांनी  तप्रधान नरेंद्र मोदी, हुकूमशाही, भ्रष्टाचार, देश, विरोधी आघाडी यांच्यावर दोरदार टीका केली आहे.

 
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, हेमंत सोरेन यांनीही राजीनामा द्यायला नको होता, त्यांनी तुरुंगातून सरकार चालवायला हवं होतं. अशा परिस्थितीत ते जिथे-जिथे निवडणूक हरतील तिथे त्या ठिकाणच्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकतील आणि सरकार पाडतील. आज मी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलेला नाही, कारण मी या हुकूमशाहीविरोधात संघर्ष करत आहे.

अरविंद केजरीवाल यांनी मोदी सरकारवर आरोप करत म्हटलं की, 'वन नेशन, वन लीडर' मिशन अंतर्गत प्रत्येक विरोधी पक्षाच्या नेत्याला अटक केली जाईल. तुम्ही सर्व चोरांना तुमच्या पक्षात सामील करुन घेतलं आणि केजरीवालांना तुरुंगात पाठवलं, केजरीवालांना अटक करून करणे ही,  भ्रष्टाचाराविरुद्धची लढाई नाही,  केजरीवाल यांना अटक केली म्हणजे ते कोणालाही अटक करतील, असा त्यांना संदेश द्यायचा आहे. या मिशनचं नाव 'वन नेशन वन लीडर' असं आहे, असं म्हणता केजरीवाल यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

 
मोदी निवृत्त, ंअमित शहा पंतप्रधान होतील

अरविंद केजरीवाल म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील वर्षी 17 सप्टेंबर रोजी 75 वर्षांचे होतील. लालकृष्ण अडवाणींप्रमाणे भाजप त्यांना निवृत्त करणार का? ही निवडणूक भाजपने जिंकल्यास मोदी अमित शाह यांना पंतप्रधान करतील. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी यांना सरकार स्थापनेनंतर दोन महिन्यांत पदावरून हटवलं जाईल.