IMDb द्वारे आजवरच्या टॉप 50 सर्वाधिक प्रसिद्ध भारतीय वेब सिरीजची घोषणा
Santosh Sakpal
June 08, 2023 12:59 AM
भारतातील IMDb युजर्सच्या पेज व्ह्यूजनुसार सेक्रेड गेम्स ही भारतातील सर्वाधिक प्रसिद्ध वेब सिरीज आहे व त्यानंतर मिर्झापूर आणि स्कॅम 1992: द हर्षद मेहता स्टोरी ह्यांचा क्रमांक येतो
IMDb द्वारे आजवरच्या टॉप 50 सर्वाधिक प्रसिद्ध भारतीय वेब सिरीजची घोषणा
भारतातील IMDb युजर्सच्या पेज व्ह्यूजनुसार सेक्रेड गेम्स ही भारतातील सर्वाधिक प्रसिद्ध वेब सिरीज आहे व त्यानंतर मिर्झापूर आणि स्कॅम 1992: द हर्षद मेहता स्टोरी ह्यांचा क्रमांक येतो
मुंबई, भारत— 5 जून 2023 — IMDb (www.imdb.com), ह्या चित्रपट, टीव्ही शोज आणि सेलिब्रिटीजवरील जगातल्या सर्वांत प्रसिद्ध व विश्वसनीय स्रोताने आज भारतातील IMDb युजर्सच्या पेज व्ह्यूजनुसार निर्धारित होणा-या आजवरच्या टॉप 50 सर्वाधिक प्रसिद्ध भारतीय वेब सिरीजची यादी घोषित केली आहे.
“आमच्या यादीमधील सर्वोच्च स्थानी असलेल्या दोन मालिका (सेक्रेड गेम्स आणि मिर्झापूर) ह्यांना पाच वर्षं पूर्ण झाले असताना भारतातील वेब सिरीजच्या छोट्या पण लक्षवेधी इतिहासासंदर्भात आढावा सांगताना आम्हांला आनंद होत आहे,” असे IMDb इंडियाच्या प्रमुख यामिनी पतोडिया ह्यांनी म्हंटले. “स्ट्रीमिंग पर्यायांच्या वाढत्या संख्येसह भारतातील वेब सिरीजमध्ये मोठ्या प्रमाणात प्रगती झाली आहे आणि परिणामी मनोरंजनाच्या चाहत्यांना प्रकार (जेनर) आणि प्रतिभा उपलब्ध झाली आहे. ह्या यादीसह आम्ही जगातील चाहत्यांना प्रसिद्ध भारतीय वेब् सिरीज बघण्यासाठी व शोधण्यासाठी मदत करत आहोत आणि IMDb वॉचलिस्टस, रेटिंग्ज आणि स्ट्रीमिंग गाईडससह चाहत्यांना सर्वोत्तम कंटेंट मिळण्यामध्ये पुढेही आम्ही मदत करत राहू."
शो चालवणारे आणि सेक्रेड गेम्सचे सह- दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवानी ह्यांनी म्हंटले, “IMDb युजर्सद्वारे सेक्रेड गेम्सला क्रमांक एकचे स्थान दिल्यात आल्याचे कळाल्यानंतर मला अतिशय अभिमान वाटत आहे आणि आनंद होत आहे. ह्या शोवर प्रेम करणा-या सर्व विशेष चाहत्यांचे मनापासून आभार आणि नेहमीप्रमाणेच अविश्वसनीय सहकारी आणि क्र्यू ह्यांचेही मनापासून आभार व त्यांचेही अभिनंदन.”
IMDb च्या आजवरच्या टॉप 50 सर्वांत प्रसिद्ध भारतीय वेब सिरीज*
1. सेक्रेड गेम्स
2. मिर्झापूर
3. स्कॅम 1992: द हर्षद मेहता स्टोरी
4. द फॅमिली मॅन
5. अस्पिरंटस
6. क्रिमिनल जस्टीस
7. ब्रीद
8. कोटा फॅक्टरी
9. पंचायत
10. पाताल लोक
11. स्पेशल ओपीएस
12. असूर: वेलकम टू यूवर डार्क साईड
13. कॉलेज रोमान्स
14. अपहरण
15. फ्लेम्स
16. धिंडोरा
17. फर्जी
18. आश्रम
19. इनसाईड एज
20. अनदेखी
21. आर्या
22. गुल्लक
23. टीव्हीएफ पिचर्स
24. रॉकेट बॉयज
25. देल्ही क्राईम
26. कँपस डायरीज
27. ब्रोकन बट ब्युटीफूल
28. जामतारा: सबका नंबर आएगा
29. ताज़ा खबर
30. अभय
31. हॉस्टेल डेझ
32. रंगबाज़
33. बंदीश बँडीटस
34. मेड इन हेव्हन
35. इममॅच्युअर
36. लिटल थिंग्ज
37. द नाईट मॅनेजर
38. कँडी
39. बिच्छू का खेल
40. दहन: राकन का रहस्य
41. जेएल50
42. राना नायडू
43. रे
44. सनफ्लॉवर
45. एनसीआर डेज
46. महारानी
47. मुंबई डायरीज 26/11
48. चाचा विधायक हैं हमारे
49. ये मेरी फॅमिली
50. अरण्यक
*1 जानेवारी 2018 ते 10 मे 2023 मध्ये भारतातील IMDb युजर्सच्या पेज व्ह्यूजनुसार निर्धारित झालेले रँकिंग. IMDb युजर्स आणि इतर लक्षावधी इतर चित्रपट व वेब सिरीज त्यांच्या IMDb वॉचलिस्टमध्ये जोडू शकतात.
आजवरच्या सर्वांत प्रसिद्ध टॉप 50 भारतीय वेब सिरीजबद्दल अतिरिक्त माहिती:
• IMDb च्या आजवरच्या टॉप 50 भारतीय वेब सिरीज यादीमध्ये नऊ सबस्क्रिप्शनवर आधारित प्लॅटफॉर्म्सचा समावेश आहे- प्राईम व्हिडिओ, नेटफ्लिक्स, सोनी लिव्ह, डिसने + हॉटस्टार, झी5, वूट, एमएक्स प्लेयर, जिओसिनेमा आणि एएलटीटी.
• यादीतील सर्वाधिक रेटिंग असलेल्या पाच मालिका स्कॅम 1992: द हर्षद मेहता स्टोरी (9.3/10), अस्पिरंटस (9.2/10), गुल्लक (9.1/10), टीव्हीएफ पिचर्स (9.1/10), आणि एनसीआर डेज (9.1/10) आहेत.
• ह्या यादीमध्ये क्राईम ड्रामा हा सर्वाधिक वारंवार असलेला प्रसिद्ध जेनर आहे व 50 पैकी 30 स्थानी तो आहे व टॉपच्या 4 स्थानीही तोच जेनर आहे —सेक्रेड गेम्स, मिर्झापूर, स्कॅम 1992: द हर्षद मेहता स्टोरी, आणि द फॅमिली मॅन.
• यादीतील टॉप 10 पैकी तीन मध्ये पंकज त्रिपाठीने महत्त्वाच्या भुमिका पार पाडल्या सेक्रेड गेम्स, मिर्झापूर, आणि क्रिमिनल जस्टीस.
• इनसाईड एज (क्र.19) ही 2017 मध्ये भारतामध्ये पेड सबस्क्रिप्शनद्वारे उपलब्ध करून देण्यात आलेल्या पहिली वेब ओरिजिनल मालिकांपैकीएक होती.
• चार शोज 2023 मध्ये रिलीज झाले— फर्ज़ी, ताज़ा खबर, द नाईट मॅनेजर, आणि राना नायडू— जे ह्या यादीमध्ये आहेत.
पुनीत कृष्णासोबत मिर्झापूरचा सहनिर्माता असलेल्या करन अंशुमान ने म्हंटले, “IMDb कडून मिळालेली ही मान्यता खरोखरच इंटरनेटवर भारतीय दर्शकांना उपलब्ध असलेल्या कंटेंटने घडवलेल्या परिवर्तनाची कहाणी दर्शवते. पुढील बाबींसंदर्भात आपण हे पुढे चालू ठेवण्यासाठी तयार आहोत व त्यामध्ये अनिश्चितता आणि आश्चर्याचीही सोबत आहे- जे कोणत्याही विशेष मालिकेमध्येही घडू शकते.”
स्कॅम 1992: द हर्षद मेहता स्टोरीमध्ये आघाडीची भुमिका बजावलेल्या प्रतिक गांधीने, म्हंटले, “ह्या शोमध्ये हंसल मेहतांसोबत काम करण्याची संधी मला मिळाली, हे माझे भाग्य आहे. स्कॅमच्या आधी आणि स्कॅमच्या नंतर असे माझे जीवन बदलले असे मला वाटते. रिलीज झाल्यानंतर इतक्या वर्षांनंतरही IMDb कडून शो ला मिळणा-या प्रेमाबद्दल आणि त्याच्या जगभरातील चाहत्यांचे मी मनापासून धन्यवाद देतो. आम्ही यश मिळवण्याचा स्कॅम शोधला होता, असे नक्कीच म्हणता येईल!”
द फॅमिली मॅन आणि फर्जी ह्यांचे निर्माते असलेले राज निदिमोरू आणि कृष्णा डी. के. ह्यांनी म्हंटले, “आमचे दोन्ही शोज- द फॅमिली मॅन आणि फर्ज़ी हे ह्या यादीत आल्याबद्दल आम्हांला कृतज्ञता वाटत आहे. आम्ही जे करत आहोत ते योग्य आहे हा आमचा विश्वास त्यामुळे पक्का झाला आणि आम्हांला आणखी कठोर मेहनत करून आमचे सर्वोत्तम योगदान देऊन उत्तम कलाकृती सादर करण्याची प्रेरणाही मिळाली.”
अधिक जाणून घेण्यासाठी, पूर्ण यादी इथे पाहा: https://www.imdb.com/list/ls568832700/