IMDb द्वारे उन्हाळ्यातील बहुप्रतीक्षित भारतीय चित्रपटांची यादी घोषित
SANTOSH SAKPAL
April 19, 2023 05:00 PM
मुंबई : IMDb (www.imdb.com), ह्या जगातल्या मूव्हीज, टीव्ही शोज आणि सेलिब्रिटीजवरील सर्वांत लोकप्रिय आणि विश्वसनीय स्रोताने ह्या उन्हाळ्यातील सर्वाधिक बहुप्रतीक्षित भारतीय मूव्हीजची यादी आज 2023 मधील IMDb युजर्सच्या आजपर्यंतच्या वास्तविक पेज व्ह्यूच्या आधाराने जाहीर केली.
IMDb चे सर्वाधिक बहुप्रतीक्षित भारतीय चित्रपट असे आहेत
1. जवान (2 जून रोजी थिएटरमध्ये)
2. एनिमल (11 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये)
3. आदिपुरुष (16 जून रोजी थिएटरमध्ये)
4. गदर 2 (11 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये)
5. छत्रपती (12 मे रोजी थिएटरमध्ये)
6. मैदान (23 जून रोजी थिएटरमध्ये)
7. योद्धा (7 जुलै रोजी थिएटरमध्ये)
8. रॉकी और रानी की प्रेम कहानी (28 जुलै रोजी थिएटरमध्ये)
9. हनुमान (12 मे रोजी थिएटरमध्ये)
10. कस्टडी(12 मे रोजी थिएटरमध्ये)
1 मे ते 31 ऑगस्ट 2023 मध्ये रिलीजचे नियोजन असलेल्या भारतीय चित्रपटांपैकी हे 10 चित्रपट IMDb युजर्ससाठी सातत्याने लोकप्रिय राहिले व ते आत्तापर्यंत 2023 मधील IMDb च्या मासिक जगभरातील 20 कोटींहून अधिक युजर्सच्या वास्तविक पेज व्ह्यूजनुसार निर्धारित झाले आहे. IMDb युजर्स त्यांच्या IMDb वॉचलिस्टमध्ये हे व इतर टायटल्स जोडू शकतात व त्यामुळे ते कधी उपलब्ध होतील ह्याचे अलर्टस त्यांना मिळतील.
ह्या उन्हाळ्यातील IMDb च्या सर्वाधिक बहुप्रतीक्षित भारतीय मूव्हीजच्या यादीमधील उल्लेखनीय चित्रपट असे आहेत:
● पठानला मिळालेल्या रेकॉर्ड ब्रेकिंग यशानंतर शाह रूख खान पडद्यावर संभाव्य डबल रोलमध्ये जवानमध्ये परत येणार आहे. हा चित्रपट लोकप्रिय अभिनेते विजय सेतूपथी आणि नयनतारा ह्यांचे हिंदी सिनेमातील पदार्पणसुद्धा असेल.
● एनिमलमध्ये कबीर सिंह ह्या त्याच्या शेवटच्या चित्रपटानंतर 4 वर्षांनी दिग्दर्शक म्हणून संदीप रेड्डी वनगाचे पुनरागमन होईल. तसेच चित्रपटामध्ये रणबीर कपूर आणि रश्मिका मंदाना असेल व परिणिती चोप्रा, अनील कपूर आणि बॉबी देओल, हेही मुख्य भुमिकांमध्ये असतील.
● गदर 2 हा 2001 चा ब्लॉकबस्टर चित्रपट गदर: एक प्रेम कथा चा सिक्वेल आहे व त्यामध्ये सनी देओल, अमीषा पटेल, आणि उत्कर्ष शर्मा आणि दिग्दर्शक अनील शर्मा 22 वर्षांनी परत एकत्र येतील.
● रणवीर सिंह आणि आलिया भट्ट हे पहिल्यांदाच रॉकी और रानी की प्रेम कहानी मध्ये एकत्र येतील. ह्या चित्रपटामध्ये ए दिल है मुश्किल ह्या शेवटच्या चित्रपटानंतर 7 वर्षांनी करण जोहर दिग्दर्शक म्हणून परत येईल तर मोठ्या पडद्यावर धर्मेंद्र आणि जया बच्चन पाच दशकांनंतर एकत्र येताना दिसतील.