भारतातील वारसा प्रार्थना ब्रॅण्ड सायकल भारत व वेस्टइंडिजच्या १००व्या सामन्यासाठी शीर्षक प्रायोजक
Santosh Sakpal
July 13, 2023 10:41 PM
जुलै २०२३: सायकल प्युअर अगरबत्ती ही भारतातील अग्रगण्य अगरबत्ती उत्पादक आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट समुदायाची प्रमुख सदस्य कॅरिबियनमधील भारत व वेस्ट इंडिज यांच्यामधील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी शीर्षक प्रायोजक आहे. या दोन देशांमध्ये पारंपारिकरित्या खेळवल्या जाणाऱ्या फ्रँक वॉरेल ट्रॉफीसाठी २०२३ सिरीजला ‘सायकल प्युअर अगरबत्ती टेस्ट सिरीज’ असे नाव देण्यात आले आहे. या सिरीजला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे, कारण दुसरा कसोटी सामना या दोन संघांमधील १००वा सामना असणार आहे. या दोन्ही संघांमध्ये १९४८ मध्ये दिल्ली येथे पहिला क्रिकेट कसोटी सामना खेळवण्यात आला होता. हा महत्त्वपूर्ण सामना २० जुलै ते २४ जुलै पर्यंत त्रिनिनाद येथील प्रतिष्ठित क्वीन्स पार्क ओव्हल मैदानावर खेळवण्यात येणार आहे.
क्रिकेटला भारतात धर्म मानले जाते. या खेळामध्ये समान आवड असलेल्या सर्व लोकांना एकत्र आणण्याकरिता मर्यादा, संस्कृती व भाषांपलीकडे जाण्याची असाधारण क्षमता आहे. सायकल प्युअर अगरबत्ती क्रिकेटच्या या एकजूट करण्याच्या क्षमतेला ओळखते व प्रशंसित करते. या प्रायोजकत्वाच्या माध्यमातून ब्रॅण्डचा खेळाला पाठिंबा देण्यासोबत आशा व सकारात्मकतेचा मोठा प्रमाणात प्रसार करण्याच्या ध्येयाप्रती योगदान देण्याचा देखील मनसुबा आहे. सायकल प्युअर अगरबत्तीचा दृढ विश्वास आहे की क्रिकेट सारख्या खेळांमध्ये व्यक्ती, समुदाय व देशाला आव्हानात्मक काळात देखील प्रेरित व उत्साहित करण्याची क्षमता आहे.
या सिरीजमध्ये तीन एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने आणि पाच ट्वेण्टी२० सामने देखील खेळवण्यात येणार आहेत. १२ जुलै ते १६ जुलै पर्यंत डोमिनिका येथील विंडसर पार्कवरील पहिल्या कसोटी सामन्यासह दौऱ्याला सुरूवात होईल.
या सहयोगाबाबत घोषणा करत सायकल प्युअर अगरबत्तीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. अर्जुन रंगा म्हणाले, ‘‘सायकल प्युअरमध्ये आमचा तरूण टॅलेंटला चालना देण्याचा व सक्षम करण्याचा प्रमुख उद्देश आहे. आमचा ठाम विश्वास आहे की, प्रत्येकजण सामन्यादरम्यान प्रार्थना करतो आणि म्हणूनच क्रिकेट एकजूट निर्माण करणारा, सीमांपलीकडे जाणारा खेळ असण्यासोबत सर्व लोकांना एकत्र आणतो. आम्हाला भारत वि. वेस्ट इंडिज २०२३ दौऱ्यासाठी आमची शीर्षक प्रायोजक म्हणून निवड झाल्याची घोषणा करताना आनंद होत आहे. हा सहयोग आम्हाला, तसेच आंतरराष्ट्रीय मंचावर देशाचे प्रतिनिधीत्व करत असलेल्या भारतीय क्रिकेट संघाला आणि देशभरातील प्रत्येक व्यक्तीला एकता, प्रार्थना व आशा या मूल्यांची जाणीव करून देतो. आम्ही या संस्मरणीय दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघाला शुभेच्छा देतो. मी या दोन्ही संघांमधील १००वा ऐतिहासिक सामना पाहण्यासाठी अत्यंत उत्सुक आहे.’’
सायकल प्युअर अगरबत्ती भारतात क्रीडाच्या विकासाला चालना देण्यामध्ये प्रमुख कंपनी म्हणून उदयास आली आहे. भारतीय क्रीडाक्षेत्रात प्रबळ उपस्थितीसह कंपनीने देशभरात विविध स्पोर्टिंग इव्हेण्ट्सना प्रगत करण्याप्रती सतत काम केले आहे. तसेच, ब्रॅण्डने राज्य व राष्ट्रीय स्तरावर क्रिकेट व सर्फिंगसारखे विविध खेळ आणि शाखांमधील तरुण टॅलेंट ओळखण्यासाठी, तसेच त्यांना निपुण करण्यासाठी उपक्रम हाती घेतला आहे. खेळाप्रती कंपनीची अविरत कटिबद्धता व आवड भारतीय क्रीडाक्षेत्रातील आगामी पिढीला निपुण करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
एनआर ग्रुपबाबत अधिक माहितीसाठी कृपया भेट द्या: http://www.nrgroup.co.in/