मुंबई, दि. 10ः घाटकोपर येथील पेट्रोल पंपावरील होर्डींग दुर्घटनेच्या चौकशीसाठी गृह विभागाने उच्च न्यायाधीश दिलीप भोसलेंच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे.समितीची रचना, कार्य कक्षा गृह विभाग ठरविणार असून समयमर्यादेत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. गृह विभागाने या संदर्भातील शासन आदेश सोमवारी काढले आहे.
घाटकोपर येथील पेट्रोल पंपावर 13 मे रोजी होर्डींग कोसळून दुर्घटना घडली. 16 नागरिकांचा यात बळी गेला. तर 70 हून अधिक जण जखमी झाले. काहींना अपंगत्व आले. बेकायदेशीर होर्डींग प्रकरणी आरोपी भावेष भिंडे याला अटक केली. उच्च न्यायालयाने देखील राज्य सरकार, मुंबई महापालिका, रेल्वे प्रशासनाला झापले. राज्य सरकारने याची दखल घेत, उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीश मार्फत चौकशी करण्यासाठी 10 जूनला गृह समितीने समिती नेमली आहे. उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश दिलीप भोसले हे या समितीचे अध्यक्ष असतील. गृह विभाग या समितीची रचना आणि कार्यकक्षा निश्चित करेल. समय मर्यादेत अहवाल सादर करण्याचे निर्देश गृह विभागाने दिले आहेत. मात्र, नेमका कधीपर्यंत अहवाल सादर करावा, याचा उल्लेख या शासन आदेशात नमूद केलेला नाही. त्यामुळे समितीच्या कार्यपद्धतीवरच संशय व्यक्त केला जातो आहे.