कोस्टल रोडच्या गळतीची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी

Santosh Gaikwad May 28, 2024 07:42 PM


 
मुंबई :  कोस्टल रोड सुरू होऊन अवघे दोन महिने उलटत नाहीत तोच त्याला गळती लागल्याने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उच्चस्तरीय अधिका-यांसह कोस्टल रोडची पाहणी केली. कोस्टल रोडच्या गळतीवर कायमस्वरूपी सोल्यूशन काढलं जाईल.कोस्टल रोडला काही ठिकाणी जॉइँट लीकेज आहेत मात्र स्कॉटलंडच्या जॉन यांची भेट घेतल्यानंतर मुख्य मार्गाला कोणताही धोका नसल्याचं महटलं आहे  कोस्टल रोडवर २५ जॉइंट आहेत त्याठिकाणी इंजेक्शनद्वारे पॉलिमर जॉइंट केले जातील विशिष्ट टेक्नॉलॉजीने काम केलं जाईल असं त्यांनी म्हटंल आहे. 

मुख्यमंत्री म्हणाले, रहदारीला कोणतीही बाधा नाही. घाटात मोठे टनेलमध्ये पण पाणी येत मात्र कोस्टलचं पाणी थांबवण्यासाठी काम केलं जाईल. पावसाळात पाणी येणार नाही अशी खात्री आहे. तसंच दुसरी लेन १० जूनपर्यंत सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. 

आदित्य ठाकरे यांनी एक्सवरून शिंदे सरकारला लक्ष्य केलं.  मविआचे सरकार कायम राहिले असते तर, मुंबई कोस्टल रोड डिसेंबर 2023 पर्यंत पूर्णपणे तयार झालेला असता. तसेच नागरिकांसाठी खुला झाला असता. पण भ्रष्ट राजवटीने आमचे सरकार पाडल्यानंतर त्या कामाचा वेग मुद्दाम कमी केला आणि खर्च वाढवण्याचे काम केले, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे.