मुंबई : मुंबई सागरी रस्ता म्हणजेच मुंबई कोस्टल रोडची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली. मुंबई महापालिका तब्बल 13 हजार कोटी रुपये खर्चून कोस्टल रोडची उभारणी करीत आहे. सध्या या कोस्टल रोडचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
समुद्रात मोठ्या प्रमाणात भरणी टाकून या रोडचे काम करण्यात येत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मोकळी जागा उपलब्ध झाली आहे. त्यापैकीच 320 एकर जागेत भव्य असे सेंट्रल पार्क उभारण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केले.
तसेच, या रोडच्या परिसरातील 200 एकर जागेत विविध प्रकारची झाडे लावण्यात येणार आहेत. जागतिक दर्जाचे हे पार्क उभारण्यात येणार असून कोस्टल रोड लवकरच मुंबईकरांच्या सेवेत दाखल होईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.