सामान्य विम्याच्या बाबतीत काही मोजकी माहिती
santosh sakpal
April 02, 2023 12:02 AM
1. आपल्यापैकी अनेक अशी लोकं आयुर्वेदिक इत्यादी इतर उपचार घेतात जे ॲलोपॅथी व्यतिरिक्त इतर उपचार असतात. आरोग्य विमा पॉलिसीमध्ये अशा उपचारांना सामील केले जाते का? कॅशलेस क्लेम सुविधेअंतर्गत त्यांच्या नेटवर्क रुग्णालयांमध्ये यांच्यासाठी सुविधा असते का?
आरोग्य विमा पॉलिसीअंतर्गत आयुर्वेदिक, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी सारख्या अॅलोपॅथीच्या पर्यायी उपचारांवर बहुतांश विमा कंपन्या संरक्षण उपलब्ध करून देतात. बहुतांश आरोग्य नुकसान भरपाई धोरणांमध्ये (हेल्थ इन्डेम्निटी पॉलिसींमध्ये) सरकारी रुग्णालयात किंवा सरकार मान्यता मिळालेल्या आणि/ किंवा क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया/ नॅशनल अॅक्रिडिटेशन बोर्ड ऑन हेल्थ द्वारे मान्यता मिळालेल्या कोणत्याही संस्थेत घेतलेले आयुष उपचार यात समाविष्ट आहेत.
जर अशी मान्यताप्राप्त रुग्णालये विमा कंपन्यांच्या पॅनेलवर असलीत तरी ते अशा रुग्णालयांमध्ये केलेल्या उपचारांसाठी कॅशलेस सेवा देऊ शकतात. कॅशलेस सुविधा ही विमा कंपनीद्वारे दिली जाणारी सेवा आहे आणि पॉलिसीचे वैशिष्ट्य नाही.
2. माझ्या नवऱ्याला आणि मला आपापल्या नियोक्त्याकडून प्रत्येकी रु. 3 लाख एवढे कॉर्पोरेट आरोग्य विमा संरक्षण मिळते आणि यामुळे दोन्ही संरक्षण (कव्हर) एकत्र केले तर रु. 6 लाख एवढे संरक्षण (कव्हर) मिळते. हे संरक्षण पर्याप्त आहे का, की मग आम्ही वेगवेगळे आरोग्य विमा संरक्षण घेतले पाहिजे?
वैद्यकीय प्रक्रियेचा खर्च आणि रुग्णालयात दाखल होण्याचा खर्च दिवसेंदिवस वाढत चालला आहे आणि त्या अनिश्चित काळाचा विचार करता प्रत्येक सदस्यासाठी आपल्या नियोक्त्याकडून मिळणारे रु. 3 लाखांचे संरक्षण पुरेल असे वाटत नाही. एखादे दुसरे संरक्षणाचे कवच असावे म्हणून, आज, येथे आवश्यक आरोग्य विमा टॉप अप योजना उपलब्ध आहेत जिथे नियोक्त्यांनी दिलेल्या संरक्षणाच्या (कव्हरच्या) वजावटीच्या बरोबरीने कमी प्रीमियमवर अतिरिक्त संरक्षणाचा (कव्हरचा) लाभ घेतला जाऊ शकतो. उदाहरणार्थ: अशी एक परिस्थिती समजा जेथे एखाद्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल होण्यासाठी रु.10 लाख भरावे लागणार आहेत आणि जर त्याच्याकडे रु. 3 लाख वजावटीसह मूळ आरोग्य योजनेपेक्षा (बेस हेल्थ प्लॅनपेक्षा) रु.10 लाख आणि त्यापेक्षा अधिकची हेल्थ टॉप अप योजना असेल, तर रुग्णालायत दाखल होण्यासाठीचे (हॉस्पिटलायझेशन) बिल दोन्ही पॉलिसींचे संयोजन साधून भरण्यात येईल, म्हणजेच कॉर्पोरेटच्या मूळ योजनेतून (बेस पॉलिसीमधून) रु. 3 लाख (या उदाहरणात) तसेच हेल्थ टॉप अप प्लॅन मधून रु. 7 लाख भरले जातील. असे कव्हर अत्यंत किफायतशीर प्रीमियम दरात उपलब्ध आहेत. अर्थातच, वैद्यकीय प्रक्रियेचा खर्च आणि रुग्णालयात दाखल होण्याचा खर्च वाढत असल्याने जास्त संरक्षण (कव्हरेज) पॉलिसी घेणे महत्वपूर्ण ठरेल.
हि माहिती श्री. श्रीराज देशपांडे यांनी दिली आहे ते एस.बी.आय. जनरल इन्शुरन्सच्या प्रमुख - आरोग्य व्यवसाय या पदावर कार्यरत आहेत.