पुणे ( श्रीराम खाडिलकर यांचे कडून) : - या देशात जर कलावंत नसते तर या देशांमध्ये अराजक माजले असते. तुम्ही कलाकार मंडळी नाटक करता आणि त्यात प्रेक्षक गुंतत जातो तो गुंतला नसता तर भयानक परिस्थिती निर्माण झाली असती असे प्रतिपादन राज ठाकरे यांनी आज येथे केले.
शंभराव्या नाट्यसंमेलनाच्या अखेरच्या दिवशी नाटक आणि मी या विषयावर दीपक करंजीकर यांनी राज ठाकरे यांची मुलाखत घेतली त्या प्रसंगी ते बोलत होते.
या संमेलनाच्या निमित्ताने एक गोष्ट मला सगळ्यांना सांगायची आहे आपण एकमेकांना मान दिला पाहिजे एकेरी किंवा टोपण नावाने हाक मारणं टाळलं पाहिजे आपण जर इतरांना मान दिला नाही तर आपली प्रतिमा सर्वसामान्य लोकांमध्ये काय होईल याचा विचार करायला हवा म्हणून माझी या निमित्ताने सगळ्या कलाकारांनी शपथ घ्यायला हवी की आम्ही एकमेकांना मान देत राहू. दक्षिणे तिला सिनेमांमध्ये काम करणारे रजनीकांत आणि संगीतकार इलया राजा हे दोघं छान मित्र आहेत पण चार लोकांमध्ये एकमेकांचे बद्दल बोलताना ते रजनीकांत सर आणि इलया राजा सर असाच त्यांचा उल्लेख करतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आत्ता या रंगमंचावर शरद पवार आले तर मी उठून त्यांना आधी नमस्कार करेन असेही त्यांनी बोलून दाखविले.
राज्यात नाटकावर असलेल्या सेन्सॉरची गरज आहे का या प्रश्नावर राज ठाकरे म्हणाले की आधी ओटीटीवर काय चाललं आहे ते पाहा, मोबाईलवर जे चालले आहे ते थांबवणार आहात का....असाही सवाल त्यांनी उपस्थित केला.
--------------