चेंबूरला अनुसूचित जाती, नवबौद्ध विद्याथ्र्यांसाठी आयटीआय

Santosh Gaikwad October 31, 2023 06:19 PM


मुंबई उपनगर जिल्ह्यातील चेंबूर येथे  अनुसूचित जाती, नवबौद्धांच्या मुला मुलींसाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) स्थापन करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. चेंबूर येथील आयटीआय सामाजिक न्याय व विशेष सहाय विभाग यांच्या सहकार्याने सुरु करण्यात येणार आहे.


 अनुसूचित जाती, नवबौद्धांच्या मुला - मुलींसाठी मुंबई विभागात शासकीय उच्चस्तर आयटीआय कमी प्रमाणात आहेत.  या मुलांना रोजगारक्षम करून उद्योगांना आवश्यक ते कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी हे आयटीआय सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला.  यामध्ये 10 ट्रेड्सच्या  (व्यवसाय अभ्यासक्रम) प्रत्येकी 2 तुकड्या याप्रमाणे 20 तुकड्या सुरु करण्यात येतील.  यासाठी शिक्षक आणि शिक्षकेतर अशी 36 पदे आणि बाह्य यंत्रणेद्धारे 8 पदे अशा 44 पदांना आणि त्यासाठी येणाऱ्या 5 कोटी 38 लाख 88 हजार इतक्या खर्चास देखील मान्यता देण्यात आली.