जेजे रूग्णालयातील निवासी डॉक्टरांचा संप अखेर मागे

Santosh Gaikwad June 04, 2023 03:54 PM


मुंबई : गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेला जे जे  रूग्णालयातील निवासी डॉक्टरांनी आपला संप मागे घेतला आहे. वैद्यकीय आयोगाच्या नियमानुसार विभागातील रिक्त पदे भराण्यात यावीत. पहिल्या वर्षाच्या निवासी डॉक्टरांचे तीन महिन्यांचे थकित विद्यावेतन द्यावे. तिसऱ्या वर्षातील निवासी डॉक्टरांची थकित देणी देण्यात यावी तसेच रूग्णालयातील अध्यापक  डॉ तात्याराव लहाने आणि डॉ रागिणी पारेख यांना पदावरून मुक्त करण्याची मागणी करण्यात आली होती. राज्य सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या असून लहाने आणि पारेख यांचा राजीनामाही मंजूर केला आहे. 

 

जेजे रूग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले की, विविध मागण्यांसाठी आम्ही संपावर गेलो हेातो  मंत्री महोदयांसोबत बैठक पार पडली. बहुतांश मागण्या मान्य झाल्या असून उर्वरित मागण्या तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना संबधितांना दिलेल्या आहेत. त्यानुसार आज आम्ही संप  मागे घेतोय, असंही जे जे रुग्णालयातील ) निवासी डॉक्टरांनी म्हटलं आहे.