जेएसडब्ल्यू आणि आयसीआयसीआय फाउंडेशनने पूर्ण केले डेव्हिड ससून लायब्ररीच्या पुनर्स्थापनेचे काम
Santosh Sakpal
June 04, 2023 03:39 PM
डेव्हिड ससून लायब्ररीच्या पुनर्स्थापनेची संकल्पना व कार्यान्वयनाचे काम जेएसडब्ल्यू फाउंडेशनच्या अध्यक्ष श्रीमती संगीता जिंदाल यांनी करवून घेतले
डेव्हिड ससून लायब्ररीच्या पुनर्स्थापनेमध्ये इंग्रजी, मराठी, गुजराती, हिंदी व कन्नड भाषेतील सुमारे ३०,००० पुस्तकांच्या पुनर्स्थापनेशिवाय खालील बाबींचा समावेश आहे:
मूळच्या उतरत्या छपराचे नव्याने बांधकाम
मिण्टन फ्लोअरिंग, ऐतिहासिक फर्निचर व वीज येण्यापूर्वीच्या वातावरणाची पुनर्निमिती
दगडी पृष्ठभूमी असलेल्या बाह्यरचनेची व अप्रतिम अंतर्गत रचनेची पुनर्स्थापना
जेएसडब्ल्यू आणि आयसीआयसीआय फाउंडेशनने पुनर्स्थापित डेव्हिड ससून लायब्ररीचे तिच्या विश्वस्तांकडे हस्तांतर केले
मुंबई, जून २, २०२३: जेएसडब्ल्यू ग्रुपने मुंबईतील कालाघोडा भागातील डेव्हिड ससून लायब्ररीच्या पुनर्स्थापना व जतनीकरणाचे काम १६ महिन्यांच्या विक्रमी वेळात पूर्ण केले आहे. या पुनर्स्थापना प्रकल्पाची संकल्पना व कार्यान्वयनाचे श्रेय जेएसडब्ल्यू फाउंडेशनच्या अध्यक्ष श्रीमती संगीता जिंदाल यांच्याकडे जाते. जेएसडब्ल्यू फाउंडेशन ही जेएसडब्ल्यू समूहाची सामाजिक विकास शाखा असून, भारतातील अग्रगण्य काँझर्वेशन आर्किटेक्ट (जतनीकरण वास्तूविशारद) श्रीमती आभा नरेन लांबा यांच्या सहयोगाने हे काम करण्यात आले. डेव्हिड ससून लायब्ररी व रीडिंग रूम (वाचनालय) यांचे बांधकाम १८६७ मध्ये करण्यात आले होते. हे कालाघोडा आर्ट डिस्ट्रिक्टमधील श्रेणी १ वारसास्थळ आहे आणि मुंबई युनेस्को जागतिक वारसास्थळांमधील, व्हिक्टोरियन गोथिक व आर्ट डेको ऑन्सेम्बल्समधील, सर्वांत पुरातन शिक्षणसंस्थांपैकी एक आहे. मुंबईतील बगदादी ज्यू व्यापारी डेव्हिड ससून यांनी सढळ हाताने दिलेल्या देणगीतून या इमारतीचे बांधकाम करण्यात आले होते. ही लायब्ररी म्हणजे शहराच्या ज्यू वारशामधील एक महत्त्वाचा घटक आहे. डेव्हिड ससून लायब्ररीच्या पुनर्स्थापनेचे काम पूर्ण झाल्यामुळे ती आता डेव्हिड ससून लायब्ररी अँड रीडिंग रूमच्या विश्वस्तांकडे २ जून रोजी हस्तांतरित केली जाणार आहे.
जेएसडब्ल्यू फाउंडेशनने या पुनर्स्थापना प्रकल्पामध्ये अनेक देणगीदारांना सहभागी करून घेतले: जेएसडब्ल्यू फाउंडेशन डेव्हिड ससून लायब्ररी पुनर्स्थापना प्रकल्पाचा तांत्रिक सहयोगी आहे. आयसीआयसीआय फाउंडेशनसह जेएसडब्ल्यू फाउंडेशन प्रकल्पाचा सहदेणगीदार आहे. याशिवाय, जेएसडब्ल्यू फाउंडेशनने हर्मीस, काला घोडा असोसिएशन, मुंबईतील इझ्रायलचे कॉन्सुलेट जनरल, एमके टाटा ट्रस्ट्स आणि अन्य काहींशी भागीदारी करून पुनर्स्थापन प्रकल्पासाठी निधी उभा केला.
डेव्हिड ससून लायब्ररी पुनर्स्थापना मंडळ: डेव्हिड ससून लायब्ररीच्या पुनर्स्थापनेची संकल्पना जेएसडब्ल्यू फाउंडेशनच्या अध्यक्ष श्रीमती संगीता जिंदाल यांची होती आणि तिचे कार्यान्वयनही त्यांनीच करून घेतले. आभा नरेन लांबा असोसिएट्स, शशांक मेहंदळे अँड असोसिएट्स, अनिल पाटील (आर्किटेक्ट), सावनी हेरिटेज कंझर्वेशन (काँट्रॅक्टर), केएकके लायटिंग (प्रकाशयोजना व रोषणाई सल्लागार), शशांक मेहंदळे (स्ट्रक्चरल इंजिनीअर), कांचन पुरी शेट्टी (लायटिंग डिझायनर) आणि पिलर प्लस (एमईपी सिस्टम्स) यांच्या समन्वयात्मक प्रयत्नांतून पुनर्स्थापनेचे काम यशस्वीरित्या पूर्ण झाले. औदार्यपूर्ण परोपकारी संकल्पना आणि सहयोगांच्या माध्यमातून, मुंबईतील सर्वांत पुरातन आणि महत्त्वपूर्ण संस्थांपैकी एक असलेल्या डेव्हिड ससून लायब्ररी आणि रीडिंग रूमचे, मूळ वैभव परत मिळवण्यात आले आहे.
जेएसडब्ल्यू फाउंडेशनच्या अध्यक्ष श्रीमती संगीता जिंदाल डेव्हिड ससून लायब्ररी आणि रीडिंग रूमची पुनर्स्थापना पूर्ण झाल्याबद्दल म्हणाल्या, “डेव्हिड ससून लायब्ररीची पुनर्स्थापना हा आम्हा सर्वांनाच समाधान देणारा प्रवास ठरला आहे. गेल्या दोन दशकांत या लायब्ररीने माझे आणि माझ्यासारख्या लक्षावधी लोकांचे आपली द्वारे खुली करून स्वागत केले आहे. विशेषत: कालाघोडा कला महोत्सवादरम्यान कितीतरी लोक या लायब्ररीला भेट देतात. पुनर्स्थापनेनंतर डेव्हिड ससून लायब्ररी मुंबईतील शैक्षणिक व सांस्कृतिक चळवळीचा आधारस्तंभ होऊ शकेल असे आम्हाला वाटते. हा पुनर्स्थापना प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी आमच्यासोबत सहयोग केल्याबद्दल मी श्रीमती आभा लांबा आणि त्यांच्या टीमचे आभार मानते.”
आयसीआयसीआय फाउंडेशन फॉर इन्क्लुजिव ग्रोथचे अध्यक्ष श्री. संजय दत्ता, डेव्हिड ससून लायब्ररीच्या पुनर्स्थापनेबद्दल म्हणाले, “समावेशक वाढ, आरोग्यसेवा, शाश्वत पर्यावरण, शाश्वत उपजीविकेसाठी कौशल्य विकास आणि अन्य सामाजिक उपक्रमांना सहाय्य करण्याचा दीर्घ वारसा आयसीआयसीआय समूहाकडे आहे. आमचा थेट काम करण्यावर, समुदायांना सर्वांगीण शाश्वत रूपांतरणात सहभागी करून घेऊन त्यात टिकून राहण्यासाठी सक्षम करण्यावर विश्वास आहे. मुंबई शहराचा समृद्ध वारसा व संस्कृती यांचे जतन करण्याच्या कामात योगदान देण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून आम्ही डेव्हिड ससून लायब्ररीच्या पुनर्स्थापनेच्या कामात सहयोग केला. पुनर्स्थापनेच्या कामामुळे लायब्ररीला तिचे गतवैभव आणि गतलौकिक पुन्हा प्राप्त होईल आणि मुंबईत शिक्षण व संस्कृतीची जोमाने वाढ होण्यासाठीही हे उपयुक्त ठरेल.”
डेव्हिड ससून लायब्ररी आणि रीडिंग रूम समितीचे अध्यक्ष श्री. हेमंत भालेकर यांच्या मते, “पुनर्स्थापनेच्या कामामुळे आम्हाला डेव्हिड ससून लायब्ररीचा वारसा शहरातील नवीन पिढीपर्यंत पोहोचवणे शक्य होणार आहे. लायब्ररीच्या इमारतीला तिचे गतवैभव पुन्हा मिळाले याचा आमच्या संपूर्ण समितीतील सदस्यांना आनंद वाटत आहे. आम्ही सर्व देणगीदारांचे आभार मानतो. डेव्हिड ससून लायब्ररी व रीडिंग रूमच्या संवर्धनाच्या व पुनर्स्थापनेच्या कामात पुढाकार घेतल्याबद्दल श्रीमती संगीता जिंदाल आणि श्रीमती आभा लांबा यांचे आम्ही विशेषत्वाने आभार मानतो.”
डेव्हिड ससून लायब्ररीची पुनर्स्थापना- ठळक वैशिष्ट्ये
डेव्हिड सलून लायब्ररीच्या, जेएसडब्ल्यू फाउंडेशनने करवून घेतलेल्या पुनर्स्थापना व जतनीकरणात डेव्हिड ससून लायब्ररीच्या संपूर्ण स्थापत्यविषयक व अंतर्गत रचनाविषयक बाबींचा समावेश आहे. उदाहरणार्थ, लायब्ररीतील पुस्तके पुन्हा रचणे, मूळ उतरते छप्पर पुन्हा बांधणे, दर्शनी भाग व अंतर्गत जागांची पुनर्स्थापना आणि ऐतिहासिक फर्निचर व अंतर्गत रचनेतील बारकाव्यांचे जतनीकरण.
सुमारे ३०,००० पुस्तके नव्याने रचणे: इंग्रजी, मराठी, गुजराती, हिंदी व कन्नड अशा पाच भाषांतील सुमारे ३०,००० पुस्तके नव्याने रचणे हा या पुनर्स्थापना प्रकल्पाचा महत्त्वाचा भाग आहे. डेव्हिड ससून लायब्ररीतील पुस्तक संचयामध्ये स्थापत्य व रचनेवरील काही अत्यंत पुरातन पुस्तकांचा समावेश आहे. रीडिंग रूमच्या पहिल्या मजल्यावरील महाकाय खणांमध्ये (बुलशेल्फ) ही पुस्तके रचण्यात आली आहेत. ही बुलशेल्व्ह्ज जुन्या काळातील असून, १८७० मध्ये या इमारतीसाठी देण्यात आलेल्या पहिल्या फर्निचरपैकी आहेत. लायब्ररीतील बुकशेल्व्ह्जच्या मूळ रचनेनुसार ही बुकशेल्व्ह्ज पुनर्स्थापित तसेच पुनर्रचित करण्यात आली आहेत. हे करताना १५६ वर्षे जुन्या श्रेणी १ वारसास्थळाच्या संरचनात्मक स्थैर्याला तसेच अखंडत्वाला धक्का बसणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. मूळची दणकट सागवानी महाकाय टेबलेही पुन्हा स्थापन करण्यात आली आहेत. दीर्घकाळ वाचनाच्या दृष्टीने अनुकूल ठरेल अशा पद्धतीने अंतर्गत रचना व प्रकाशयोजना करण्यात आली आहे.
मूळच्या उतरत्या छपराचे नव्याने बांधकाम: पुनर्स्थापना प्रकल्पातील हा महत्त्वाचा भाग होता. १९९७ मध्ये झालेल्या लायब्ररीच्या नूतनीकरणाच्या कामात मूळच्या उतरत्या छपराच्या जागी सिमेंट काँक्रिटचा स्लॅब घालण्यात आला होता. काँक्रिटच्या स्लॅबमुळे कालांतराने इमारतीत पाण्याची गळती सुरू झाली होती. पुनर्स्थापनेच्या कामात, हा काँक्रिट स्लॅब कौशल्याने पाडून टाकण्यात आला आणि नवीन एमएस चौकटींचे पोर्टल रूफ बसवण्यात आले. या छपरामध्ये अनेक जलावरोधक (वॉटरप्रूफ) तसेच संरक्षक स्तर आहेत. मूळ छप्पर पुन्हा बांधताना, आधुनिक व पारंपरिक बांधकाम तंत्रांचा संमिश्र पद्धतीने वापर करून, स्थापत्यविषयक व रचनाविषयक कल्पकता साध्य करण्यात आली. छपरालगतच्या फिरत्या रंगांच्या त्रिकोणी भिंती तसेच मूळ छतावरील क्रेस्टिंग व फिनियल्ससारख्या बारीकसारीक बाबी, सखोल इमारतीच्या संग्रहाचा सखोल व विस्तृत अभ्यास करून, पुन्हा तयार करण्यात आला. त्यातूनच बर्मा सागवानी लाकडांची छते आणि वासे यांसारख्या बाबींची नव्या स्वरूपात पुनर्स्थापना करून मूळचे उतरते छप्पर आकाराला आणले गेले.
अभिजात दगडी बाह्यरचना व अप्रतिम अंतर्गत रचनेची पुनर्स्थापना: डेव्हिड ससून लायब्ररीचा बाह्य दर्शनी भाग आणि अप्रतिम अंतर्गत रचना यांची पुनर्स्थापना, दगड स्वच्छ करणे, संवेदनशील प्रवेशद्वार आच्छादन साहित्याद्वारे दरजा भरणे व संरक्षण अशा विस्तृत व काळजीपूर्वक प्रक्रियेच्या माध्यमातून करण्यात आली आहे. यात पुढील भागातील, विशेषत: द्वारमंडपातील (पोर्च), उत्थानावरील दगडांच्या पृष्ठभूमीच्या पुनर्स्थापनेचा तसेच पहिला मजला व गच्चीवरील शोभिवंत कंगोऱ्यांचा समावेश आहे. या प्रख्यात इमारतीमधील अप्रतिम अंतर्गत रचना, लायब्ररी, वाचनालय, कार्यालये ही सर्व स्थळे, अधिक प्रशस्त व्यवस्थेच्या उद्देशाने पुन्हा निर्माण करण्यात आले आहेत.
मूळ मिण्टन टाइल फ्लोअरिंची पुनर्निमिती: डेव्हिड ससून लायब्ररीच्या पुनर्स्थापनेमध्ये बारीक तपशिलांनी युक्त अशा मिण्टन टाइल फ्लोअरिंगच्या पुनर्निमितीचाही समावेश आहे. नव्याने स्थापित करण्यात आलेल्या लायब्ररीमध्ये बहुतेक ठिकाणी मूळचे मिण्टन टाइल फ्लोअरिंग कायम ठेवण्यात आले आहे. प्रवेशद्वाराजवळील स्वागतकक्षापासून ते पहिल्या मजल्यावरील रीडिंग रूम व व्हरांड्यामध्ये हे फ्लोअरिंग ठेवण्यात आले आहे. मिण्टन फ्लोअरिंगचे अनेकविध नमुने वेगवेगळ्या खोल्यांमध्ये होते, ते काळजीपूर्वक जतन करण्यात आले आहेत. या टाइल्स मुळात १९व्या शतकात इंग्लंडमधून आयात करण्यात आल्या होत्या. पुनर्स्थापित मिण्टन फ्लोअरिंग हे ठळक रंगातील मोझॅकच्या स्वरूपात वापरल्या जाणाऱ्या छोट्या सिरॅमिक टाइल्सपासून तयार करण्यात आल्या आहेत.
ऐतिहासिक फर्निचरची पुनर्स्थापना: डेव्हिड ससून लायब्ररीच्या पुनर्स्थापना प्रकल्पामध्ये तेथील ऐतिहासिक फर्निचरची काळजीपूर्वक पुनर्बांधणी व पुनर्स्थापना यांचाही समावेश होता. डेव्हिड ससून लायब्ररी आणि रीडिंग रूममध्ये प्राचीन तसेच ऐतिहासिक फर्निचरचे अनेक नमुने आहेत. गोथिक शैलीतील घटकांसह तयार करण्यात आलेली महाकाय सागवानी टेबलांचा या रोचक फर्निचरमध्ये समावेश होतो. तसेच काही फर्निचरमध्ये हाताने घडवलेल्या सिरॅमिक टाइल्स बसवलेल्या आहेत. हे सर्व फर्निचरचे नमुने म्हणजे लायब्ररीच्या मूळ निर्मात्यांनी मागे ठेवलेल्या वारशाचा भाग आहेत.
पुनर्निर्मित मूळ प्रकाश रचना: वीज येण्यापूर्वीच्या काळात लायब्ररीच्या इमारतीत गॅस लायटिंग वापरले जात होते. वीज येण्यापूर्वीच्या काळात मुख्य जिन्यावर ठेवल्या जाणाऱ्या दिव्याची पुन्हा निर्मिती करून तो पुन्हा त्याच जागी ठेवण्यात आला आहे.
वारसा इमारतींचे विस्तृत वॉटरप्रूफिंग: भिंतींमधून तसेच मोकळ्या जागांमधून झिरपलेल्या पाण्यामुळे डेव्हिड ससून लायब्ररीचे काळाच्या ओघात खूप नुकसान झाले होते. पुनर्स्थापना प्रकल्पादरम्यान जलावरोधन (वॉटरप्रुफिंग) व मोकळ्या जागा बंद करण्याची प्रक्रिया सर्वत्र करण्यात आली, जेणेकरून इमारत पाण्यापासून संरक्षित राहील.
जागतिक ख्यातीच्या कंझर्वेशन आर्किटेक्ट श्रीमती आभा नरेन लांबा यांच्या मते, “या प्रवासाचा पुढचा टप्पा सुरू करताना आम्ही रोमांचित आहोत. या टप्प्यात डेव्हिड ससून लायब्ररीच्या इमारतीतील रमणीय भूप्रदेश व उद्यानांची पुनर्स्थापना केली जाईल. श्रीमती संगीता जिंदाल आणि डेव्हिड ससून लायब्ररी टीम यांच्यासोबत या प्रकल्पाचे काम पुढे सुरू ठेवता येणार आणि या अभिजात वारसा इमारतीचा जादूई वारसा जतन करण्याची संधी मिळणार याचा मला आनंद वाटतो.”
डेव्हिड ससून लायब्ररी आणि रीडिंग रूमबाबत भविष्यकाळातील पुनर्स्थापना योजना: डेव्हिड ससून लायब्ररीच्या पुनर्स्थापना प्रकल्पाच्या पुढील टप्प्यात लायब्ररीतील रम्य जागा व उद्याने यांचे संवर्धन करण्यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. यामुळे मुंबईकरांना शहरातील व्यग्र दिवसांमध्ये काही सुखद क्षण अनुभवता येतील. अभ्यागतांना लायब्ररीच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाविषयी शिक्षित करणारे अन्वयार्थ फलक लावण्याबद्दल डेव्हिड ससून लायब्ररी समिती, श्रीमती संगीता जिंदाल आणि श्रीमती आभा एन. लांबा यांच्यात चर्चा सुरू आहेत. त्याचप्रमाणे येथे एक कलादालन स्थापन करण्याचीही योजना आहे.
जेएसडब्ल्यू फाउंडेशन विषयी: जेएसडब्ल्यू फाउंडेशन ही जेएसडब्ल्यू समूह या भारतातील आघाडीच्या उद्योग समूहाची सामाजिक विकास शाखा आहे. गेल्या तीन दशकांपासून ग्रामीण समुदायांना त्यांची आयुष्ये समृद्ध करण्यासाठी सक्षमता देण्याचा समृद्ध वारसा या फाउंडेशनकडे आहे. तसेच संस्थेने सातत्याने उत्तम कामगिरी केली आहे. शिक्षण, आरोग्य व पोषण, कौशल्य विकास, ग्रामीण बीपीओ, पर्यावरण व जल, क्रीडा आणि कला व वारसा या क्षेत्रांवर फाउंडेशनने लक्ष केंद्रित केले आहे. प्रत्यक्ष क्षेत्रीय कामाच्या माध्यमातून फाउंडेशन १४ भारतीय राज्यांमधील ३३ जिल्ह्यांत उपक्रम राबवते. जेएसडब्ल्यूच्या कारखाने व पोर्ट ठिकाणांच्या भवतालच्या समुदायांना यासाठी प्राधान्य दिले जाते. या ठिकाणांच्या पलीकडील समुदायांपर्यंतही जेएसडब्ल्यू फाउंडेशन पोहोचते आणि भारताच्या सामाजिक विकासात अर्थपूर्ण मार्गाने योगदान देते. कोविड-१९ साथीदरम्यान फाउंडेशनने या ठिकाणांवरील अनेक समुदाय व कुटुंबांना अन्न व आरोग्यसेवा पुरवून सहाय्य केले. जेएसडब्ल्यू फाउंडेशनच्या सर्वांगीण जीवनचक्राधारित उपायांचा प्रभाव भारतभरातील १० लाखांहून अधिक वंचित व्यक्तींच्या आयुष्यावर सकारात्मकरित्या पडला आहे. वार्षिक १००,००० रुग्ण तपासण्याची क्षमता असलेल्या कर्नाटक व महाराष्ट्रातील दोन रुग्णालयांसोबत संस्था काम करते. ग्रामीण भागातील १४०,००० वंचित मुलांच्या आयुष्यांवर, संस्थेच्या शैक्षणिक उपक्रमांचा, सकारात्मक प्रभाव पडला आहे. तर कृषी, महिला एसएचजी, बीपीओ आदी क्षेत्रांतही उपजीविकेचे नवीन स्रोत तयार करण्यात आले आहेत. त्याचा लाभ १६,००० शेतकरी व १०,००० ग्रामीण स्त्रियांना झाला आहे. ग्रामीण भागातील गावांमध्ये ७५०० हून अधिक शौचालये बांधून फाउंडेशनने स्वच्छतेच्या सुविधाही उपलब्ध करून दिल्या आहेत. २००,००० गरजू व्यक्तींना सरकारी कल्याण योजनांचा लाभ घेण्यात फाउंडेशनने मदत केली आहे. फाउंडेशनद्वारे २३००० तरुणांना अनेकविध कौशल्यांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यातून त्यांच्यात रोजगार व उद्योजकेची कौशल्ये निर्माण झाली आहेत. १६००० ग्रामीण स्त्रियांचा सहभाग असलेले १४०० स्वयंसहाय्यता गट गरिबांतील गरिबांना कर्ज उपलब्ध करून देत आहेत. जेएसडब्ल्यू फाउंडेशनचे कला व वारसा क्षेत्रातील काम हे भारतातील वारसास्थळांच्या पुनरुज्जीवनाशी निगडित आहे. हम्पीतील चंद्रमौळेश्वर मंदिर, केनेनेठ एलियाहो सिनेगॉग, मुंबईतील डेव्हिड ससून लायब्ररी ही याची काही उदाहरणे आहेत. या पुनर्स्थापना प्रकल्पांना जगभरात मान्यता प्राप्त झाली आहे आणि प्रतिष्ठेचे आंतरराष्ट्रीय पुरस्कारही प्राप्त झाले आहेत.
आयसीआयसीआय फाउंडेशन विषयी: आयसीआयसीआय बँकेने २००८ मध्ये आपले सामाजिक विकासाचे प्रयत्न वाढवण्यासाठी तसेच विस्तारण्यासाठी आयसीआयसीआय फाउंडेशनची स्थापना केली. समावेशक वाढ हे फाउंडेशनचे उद्दिष्ट आहे. आयसीआयसीआय फाउंडेशन देशभरात चार क्षेत्रांत काम करते- पर्यावरणाचे संरक्षण, वंचितांसाठी उपजीविका आणि कौशल्य विकास, परवडण्याजोगी आरोग्यसेवा आणि आर्थिक समावेशन ही ती क्षेत्रे होत. आयसीआयसीआय फाउंडेशनने आपल्या अनेकविध उपक्रमांच्या माध्यमातून १०.९ दशलक्ष लोकांच्या आयुष्यात बदल घडवून आणल्याचे, ३१ मार्च २०२३ रोजी उपलब्ध आकडेवारीतून समजते.