कुमार कदम यांना काकासाहेब पुरंदरे पत्रकारिता पुरस्कार

Santosh Gaikwad May 20, 2023 01:18 PM


मुंबई :  यंदाचा काकासाहेब पुरंदरे पत्रकार पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार आणि मुंबई मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष कुमार देवराम कदम यांना जाहीर झाला आहे.  रविवार २१ मे २०२३ रोजी संध्याकाळी ५:३० वाजता  आचार्य अत्रे सभागृह, आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान सासवड येथे हा पुरस्कार सोहळा होणार आहे.  आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान पुरंदर अध्यक्ष विजय वि. कोलते यांच्या हस्ते कुमार कदम यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महा. साहित्य परिषद सासवड शाखा अध्यक्ष ॲड. आण्णासाहेब खाडे तर काकासाहेब पुरंदरे प्रतिष्ठान मुंबई अध्यक्ष ॲड. आरती पुरंदरे (सदावर्ते) यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.


साहित्य सम्राट आचार्य अत्रे यांच्या समवेत काम केलेले ज्येष्ठ पत्रकार व सासवडचे सुपुत्र कै. चंद्रकांत दत्तात्रय पुरंदरे यांच्या ८३ व्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो.  आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान, पुरंदर यांच्या वतीने पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.