कल्याणात मोदींच्या सभेपूर्वीच मानापमान नाट्य, सेनेच्या जिल्हा प्रमुखाचा राजीनामा !

Santosh Gaikwad May 15, 2024 03:43 PM


 कल्याण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज कल्याणात जाहीर सभा आहे. मोदींच्या सभेपूर्वीच पदाधिका-यांमध्ये मानापमान नाट्य रंगले. प्रोटोकॉलप्रमाणे  व्यासपीठावर स्थान न मिळाल्याने  शिवसेना शिंदे गटाचे  कल्याण मुरबाड जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांनी नाराजी व्यक्त करत थेट राजीनामा दिलाय 

अरविंद मोरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहित नाराजी व्यक्त केलीय.   आमदार, शहरप्रमुख, माजी आमदार हे व्यासपीठावर निमंत्रीत असताना शिवसेना पदाच्या प्रोटोकॉलप्रमाणे यजमान जिल्हा प्रमुखाला व्यासपीठावर उपस्थित राहण्याचा मान मिळायला हवा होता. पण जाणीवपूर्वक माझे नाव डावलले असल्याने मी माझ्या जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देत आहे. असे मोरे यांनी मुख्यमंत्रयांनी पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. 

  वर्षभरपूर्वी  अरविंद मोरे  यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला रामराम करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे   यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता.  एकनाथ शिंदे यांनी कल्याण आणि मुरबाड जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी अरविंद मोरे यांच्याकडे दिली होती. 

 . अरविंद मोरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवले आहे कल्याण, भिवंडी, ठाणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांसाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा होणार आहे. त्यापूर्वीची हे मानापमान नाटय रंगल्याचे दिसून आले.