जिभेचे चोचले पुरवा परवडणार्या दरांत
९९ रुपयांपासून मिळवा क्लासिक चिकन रोल आणि डबल चिकन रोल असे दोन पर्याय
मुंबई : जिभेचे चोचले तर पुरवायचेत पण खिसा काही भलतंच सांगतोय, अशी अवस्था आपल्यापैकी अनेकांची अनेकदा होत असते. “मला अमुक पदार्थ खायचाच आहे, काय बहारदार चव आहे त्याची”या वाक्याला जोडूनच “एवढे पैसे खर्च करायलाच हवेत का?”हे वाक्यदेखील अनेक खवय्यांसमोरची-त्यातही नव्या पिढीसमोरची मोठी समस्या असते. पण आता यावर एक धमाल पर्याय शोधलाय कर्नल सँडर्स यांनी केएफसीच्या नव्या चिकन रोलच्या रुपात. कुरकुरीत चिकनचा हा नवा रोल उपलब्ध असेल अवघ्या ९९ रुपयांपासून.
झणझणीत लसूण आणि नॅशविल सॉसच्या स्वादासह कुरकुरीत कांदे घालून पराठ्यात गुंडाळलेला हा चिकन क़लासिक रोल आता अवघ्या ९९ रुपयांत, तर डबल चिकन रोल अवघ्या १४९ रुपयांत सादर करण्यात आला आहे.
जेवणाची वेळ कोणतीही असो, केएफसीच्या चाहत्यांना आता खिशाचा विचार आणि जिभेचे चोचले यांच्यात सांगड घालणे अगदी सोपं झालं आहे. खाण्याचा दर्जा राखतानाच केएफसी तुमच्यापर्यंत हे रोल पोहोचवताना सुरक्षेचे निकषही काटेकोरपणे पाळत आहेच. तेव्हा निर्धास्त व्हा आणि या नव्या रोल्सची मजा लुटा.