कोटक लाइफ इन्शुरन्स ग्राहकांसाठी सादर करत आहे हॅपी यू- आरोग्य व स्वास्थ्याशी संबंधित ॲप

Santosh Sakpal July 21, 2023 11:15 PM

मुंबई, 20 जुलै, 2023 : कोटक महिंद्रा लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडने (कोटक लाइफ) आज हॅपी यू हे ॲप आणल्याची घोषणा केली. हे एक आरोग्य व स्वास्थ्याशी निगडित ॲप आहे. एका रोमांचक कृती-आधारित आनंददायी प्रणालीवर हे ॲप काम करते. वापरकर्त्यांना सर्वांगीण आरोग्य व्यवस्थापन अनुभव पुरवण्याच्या दृष्टीने ॲप डिझाइन करण्यात आले आहे. ग्राहकांच्या सातत्याने उत्क्रांत होत असलेल्या गरजा पूर्ण करण्यासाठी नवोन्मेषकारी उपाय देण्याची कोटक लाइफची बांधिलकी या उपक्रमातून आणखी दृढ झाली आहे.

एखादी व्यक्ती किती पावले चालली, किती तास झोपली यांसारख्या आरोग्यविषयक निकषांसोबतच कुटुंबासोबत घालवलेला वेळ, घराची स्वच्छता, कारपूलिंग, पर्यावरणासाठी पुढाकार घेऊन केलेली कामे आणि अन्य सामाजिक उपक्रमांच्या आधारे प्राप्त केलेल्या पॉइंट्सवर हॅपी यू  ॲप काम करते. ह्या पॉइंट्सचे रूपांतर ॲपद्वारे वास्तव मूल्याच्या लाभांमध्ये केले जाते. म्हणजेच डॉक्टरांसोबत मोफत कन्सल्टेशन आणि अन्य निदानात्मक व औषधांच्या स्वरूपातील लाभ वापरकर्त्याला दिले जातात. शिवाय, आपले छंद जोपासण्यासाठीही वापरकर्ते पॉइंट्स रिडीम करू शकतात. तसेच संबंधित व्यक्तीच्या एकंदर स्वास्थ्यासाठी व सर्वांगीण आनंदासाठी उपयुक्त ठरतील अशा अन्य काही रोमांचक ऑफर्सही पॉइंट्सचा वापर करून घेता येतात.

कोटक महिंद्रा लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक महेश बालसुब्रमणियन म्हणाले, “आरोग्य आणि स्वास्थ्य या प्रत्येकासाठी प्राधान्याच्या बाबी झाल्या आहेत. आम्हाला ही धारणा समजते आणि आम्ही तिचा आदरही राखतो आणि हम है... हमेशा या आमच्या ब्रॅण्डवचनाला नेहमीच जागतो. ग्राहकांना आर्थिकदृष्ट्या संरक्षित करण्याशिवाय, निरोगी व आनंदी आयुष्य जगण्यातही त्यांना मदत करण्याची आमची इच्छा आहे. आमचे आरोग्य व स्वास्थ्यविषयक ॲप हॅपी यू आणताना आम्हाला खूपच आनंद होत आहे. आमच्या ग्राहकांना तसेच त्यांच्या कुटुंबियांना व मित्रमंडळींना शारीरिक व मानसिक दोन्ही दृष्टींनी अधिक निरोगी आयुष्य जगण्यात मदत व्हावी या उद्देशाने हे ॲप विकसित करण्यात आले आहे.”

हॅपीयू  ॲपचा को-बी नावाचा एक मोहक मॅस्कॉट (शुभंकर) आहे. तो या प्रवासात वापरकर्त्यांसोबत असेल. हे ॲप ॲप स्टोअर किंवा प्ले स्टोअरवरून डाउनलोड केले जाऊ शकते. ॲपचा अफलातून अनुभव घेण्यासाठी केवळ स्टार्ट बटनावर क्लिक करायचे आहे.

प्रात्यक्षिक बघण्यासाठी क्लिक करा:

(Click here to watch the Demo)

ॲपमध्ये पुढील अनन्यसाधारण सुविधा आहेत:

  • तुमच्या जवळच्या व्यक्तींच्या स्वास्थ्याविषयी जाणून घेत राहण्यासाठी तुमचे ग्रुप्स (ट्राइब्ज) तयार करणे.
  • केवळ फेस स्कॅन करून महत्त्वाच्या बाबींची तपासणी करणे.
  • आयसीई (इन केस ऑफ इमर्जन्सी अर्थात आपत्कालीन परिस्थिती आल्यास) ट्युटोरिअल्स (चाचण्या).
  • डीएएस (डिप्रेशन, अँग्झायटी अँड स्ट्रेस अर्थात नैराश्य, चिंता व तणाव) स्कोअर समजून घेणे आणि
  • तणावमुक्त होण्यात मदत करणारा अनविंड विभाग.