मुंबई : मोदी सरकारने घेतलेल्या कामांची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने 'Modi@9 जनसंपर्क अभियान' राबविण्यात येणार आहे त्या समितीच्या 'प्रदेश सहसंयोजक' पदी माजी गृहराज्यमंत्री तथा भाजपचे नेते कृपाशंकर सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही नियुक्ती केली आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोककल्याणकारी सरकारला नऊ वर्षे पूर्ण होत असून, मागील काळात सरकारने घेतलेल्या कल्याणकारी योजनांची माहिती वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचविण्याचे कार्य ही समिती करणार आहे. कृपाशंकर सिंह यांचा राजकीय क्षेत्रातील अभ्यास आणि अनुभव लक्षात घेता त्यांच्यावर प्रदेश सहसंयोजक म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे.