एल अँड टी – सुफिनने बांधकाम साहित्याच्या डिजिटल खरेदीसाठी CREDAI-MCHI सोबत केला सामंजस्य करार

santosh sakpal April 01, 2023 09:29 PM

मुंबई, : लार्सन अँड टुब्रो (L&T) द्वारे समर्थित औद्योगिक उत्पादने आणि सेवांच्या खरेदी आणि विक्रीसाठी एकात्मिक व्यासपीठ असलेल्या एल अँड टी – सुफिनने मुंबई आणि मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन (MMR) मध्ये बांधकाम व्यवसाय क्षेत्राशी संबंधित खरेदीसाठी वन स्टॉप डिजिटल शॉप निर्माण करण्यासाठी आज कॉन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया (CREDAI) महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्री (MCHI) सोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्याची घोषणा केली.

नवीन भागीदारी CREDAI-MCHI च्या सदस्यांना एल अँड टी – सुफिन प्लॅटफॉर्मद्वारे सोयीस्कर, किफायतशीर आणि कार्यक्षम रीतीने इमारत आणि बांधकाम साहित्य खरेदी करण्यास आणि संबंधित सेवांमध्ये डिजिटलपणे अॅक्सेस करण्यास सक्षम करेल.

नव्याने सुरू झालेल्या भागीदारीबद्दल बोलताना एल अँड टी चे श्री. एस.एन. सुब्रह्मण्यन म्हणाले, "आम्हाला CREDAI-MCHI सोबत या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करताना आनंद होत आहे. एल अँड टी – सुफिन हा एकमेव तांत्रिक-सक्षम बी टू बी प्लॅटफॉर्म असून त्याचे उद्दिष्ट उच्च दर्जाच्या मानकांचे पालन आणि वित्तपुरवठा पर्यायांसह मुंबई आणि एमएमआर मधील बांधकाम व्यवसाय विकसकांना सुलभ आणि किफायतशीर खरेदी अनुभव मिळवून देण्याचे आहे."

या भागीदारीबद्दल क्रेडाई-एमसीएचआयचे अध्यक्ष श्री. बोमन इराणी म्हणाले, "क्रेडाई-एमसीएचआयचा एल अँड टी – सुफिन सोबतचा सहयोग हे एक क्रांतिकारी पाऊल असून एल अँड टी एक समूह म्हणून बांधकाम आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात आघाडीवर आहे. CREDAI-MCHI च्या विकासकांना उत्तम दर्जाची उत्पादने पुरवण्याचा उपक्रम आमच्या सदस्यांना बांधकामासाठी उत्पादनांच्या विस्तृत श्रेणीत सहज प्रवेश करण्यास मदत करेल. हे सहकार्य बंधुत्व मजबूत करण्यात आणि आमच्या सदस्य विकासकांना संसाधनांची बचत करण्यास मदत करेल. आमच्या सदस्यांना उद्योगातील नवीनतम उत्पादनांचा अॅक्सेस मिळवण्यासाठी ते मजबूत व्यासपीठ ठरेल.”

एल अँड टी – सुफिनने प्लॅटफॉर्मवर व्यवहार करणाऱ्या ३५,००० हून अधिक प्रमाणित खरेदीदार आणि विक्रेत्यांसह ५० हून अधिक उत्पादन श्रेणींमध्ये पसरलेल्या ३ लाखांहून अधिक उत्पादनांमध्ये प्रवेश सक्षम केला आहे. एल अँड टी – सुफिन औद्योगिक आणि बांधकाम वस्तूंसाठी पुरवठा साखळी बदलून ग्राहक आणि खरेदीदारांना एल अँड टी च्या इन्फ्रा-टेक-फिन डोमेनने समर्थित डिजिटल प्लॅटफॉर्मवर एकमेकाच्या जवळ आणण्यासाठी सज्ज आहे.

CREDAI-MCHI ही एमएमआर प्रदेशातील बांधकाम व्यवसाय उद्योगातील सदस्यांचा समावेश असलेली शिखर संस्था आहे. महाराष्ट्र रिअल इस्टेट नियामक प्राधिकरण (MahaRERA) ने अधिकृतपणे CREDAI-MCHI ची महाराष्ट्र राज्यातील गृहनिर्माण प्रकल्पांसाठी स्वयं-नियामक संस्था (SRO) म्हणून नियुक्ती केली आहे.