सोनू सूदच्या 'फतेह'साठी ली व्हिटेकर ॲक्शन सीन्स देणार

Santosh Sakpal May 11, 2023 11:36 PM

सोनू सूदच्या 'फतेह'साठी ली व्हिटेकर ॲक्शन सीन्स देणार
 

CINE REPOTER/SHIVNER

सोनू सूद ली व्हिटेकर  यांना सोबत घेऊन फतेह चित्रपटासाठी स्टंट टीम घेऊन येतोय. ज्युरासिक पार्क 3, फास्ट अँड फ्युरियस आणि बाहुबली २ सारख्या चित्रपटांसाठी काम करणारे ली व्हिटेकर फेतहसाठी ॲक्शन सीन्स देणार आहेत. सोनू सूद त्याच्या आगामी अ‍ॅक्शन-पॅक्ड चित्रपट फतेहसाठी सज्ज आहे, ज्यामध्ये यापूर्वी कधीही न पाहिलेले अॅक्शन सीन प्रेक्षकांना बघायला मिळणार आहेत. जगभरातील बेस्ट काम करण्याचा अनुभव असलेल्या ली व्हिटेकर यांना या अॅक्शन सीक्वेन्सवर काम करण्यासाठी एका विशेष टीमचे नेतृत्व करण्यासाठी लॉस एंजेलिसमधून आणण्यात आली आहे. 

lee Whittaker यांनी ज्युरासिक पार्क 3, Fast & Furious 5, X-Men Apocalypse, Pearl Harbour, Baahubali 2 आणि इतर अनेक चित्रपटांसह अनेक दर्जेदार काम केली आहेत. एलएच्या विशेष टीमच्या मदतीने प्रेक्षकांपर्यंत कधीही न पाहिलेले काहीतरी बेस्ट काम पोहचणार आहे, असं सोनू सूद सांगतो आणि स्वतःला आव्हान देण्याबद्दल त्याने सोशल मीडियावरून उत्साह व्यक्त केला आहे.

सोनू सूद-ली वटेकर

“मला विश्वास आहे की अॅक्शन थ्रिलर्स लोकांच्या पसंतीस नक्कीच पडतील. फतेहसह, मी एक कलाकार म्हणून स्वतःला आव्हान देण्याचा आणि प्रेक्षकांनी यापूर्वी कधीही न पाहिलेले काहीतरी काम देण्याचा नक्कीच प्रयत्न केला आहे. ली व्हिटेकर आणि उर्वरित टीमने त्यांचा कामात कोणतीही कसर सोडली नाही. काही अविश्वसनीय अ‍ॅक्शन सीक्वेन्स तयार करताना जे आम्ही पडद्यावर दाखवण्यासाठी उत्सुक आहोत,” असे सोनू सूद म्हणतो.

या चित्रपटात सोनू सूद आणि जॅकलिन फर्नांडिस मुख्य भूमिकेत आहेत. फतेह या वर्षाच्या शेवटी रिलीज होणार आहे.