विधानपरिषदेच्या नवनिर्वाचित 11 सदस्यांना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून शपथ

Santosh Gaikwad July 28, 2024 01:13 PM


मुंबई : (प्रतिनिधी ) -  महाराष्ट्र विधानपरिषदेवर निवडून आलेल्या अकरा सदस्यांना  विधानपरिषदेच्या उपसभापती  डॉ. नीलम गोऱ्हे यांनी  मध्यवर्ती सभागृह, विधान भवन, मुंबई येथे शपथ दिली.

 या शपथविधीस विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते   अंबादास दानवे, विधानमंडळ सचिवालयाचे सचिव 1 (कार्यभार)  जितेंद्र भोळे, सचिव 2 (कार्यभार)  विलास आठवले आदी  संख्येने उपस्थित होते. 


1. श्रीमती पंकजा गोपीनाथराव मुंडे,

2. श्री. सदाशिव रामचंद्र खोत, 

3. डॉ. परिणय रमेश फुके,

4. श्रीमती भावना पुंडलीकराव गवळी, 

5. श्री. कृपाल हिराबाई बालाजी तुमाने,

6. श्री. योगेश कुंडलीक टिळेकर,

7. डॉ.प्रज्ञा राजीव सातव, 

8. श्री. शिवाजीराव यशवंत गर्जे,

9. श्री.अमित गणपत गोरखे,

10. श्री.मिलिंद केशव नार्वेकर, 

11. श्री. राजेश उत्तमराव विटेकर

***