एलआयसी (LIC)चा 2023चा एकूण प्रीमियम 17%ने वाढून 2.32 ट्रिलियन रुपये झाला

SANTOSH SAKPAL April 26, 2023 05:10 PM

MUMBAI  : आर्थिक वर्ष 2022 -23 साठी गोळा केलेला एकूण प्रीमियम, 16.67%ने वाढून 1.99 ट्रिलियन रुपयांवरून 2.32 ट्रिलियन रुपये झाला. निव्वळ आकारमानाच्या बाबतीत, देशात विमा उद्योगाच्या वाढीचा प्रसार करणाऱ्या या विमा दिग्गज कंपनीशी इतर कोणत्याही कंपनीची तुलना होऊ शकत नाही. गोळा केलेल्या प्रीमियमच्या बाबतीत, मार्च 2023 पर्यंत तिचा 62.58% बाजार हिस्सा कायम आहे.

लाइफ इन्शुरन्स कौन्सिल (Life Insurance Council)च्या आकडेवारीनुसार, खासगी विमा कंपन्यांनी, 1 एप्रिल पासून नॉन - लिंक्ड पॉलिसीजसाठी कर सवलत मागे घेण्यापूर्वी, फायदा घेण्यासाठी शेवटच्या मिनिटातील ग्राहकांच्या गर्दीमुळे मार्चमध्येही मोठ्या प्रमाणात प्रीमियम गोळा केला आहे.

आर्थिक वर्ष 2023साठी एलआयसी (LIC)ची प्रीमियम वाढ ही, तिच्या सूचीबद्ध समकक्षांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे, ज्यात एचडीएफसी लाइफ (HDFC Life) 18.83%, एसबीआय लाइफ (SBI Life) 16.22% आणि आयसीआयसीआय प्रूडेंशियल लाइफ इन्शुरन्स  कंपनी (ICICI Prudential Life Insurance Company) 12.55% ने आघाडीवर आहे.  

आर्थिक वर्ष 23मध्ये, या विमा दिग्गजाच्या इंडिव्हिज्युअल सिंगल प्रीमियममध्ये 3.30%ने वाढ झाली आणि इंडिव्हिज्युअल नॉन - सिंगल प्रीमियममध्ये 10% वाढ झाली, तर तिचा ग्रुप सिंगल प्रीमियम 21.76%ने वाढून 1,37,350.36 कोटी रुपयांवरून 1,67,235 कोटी रुपये झाला.

मार्च 2023 महिन्यासाठी, वैयक्तिक श्रेणीसाठी एलआयसी (LIC)चे प्रीमियम रु. 10,000 कोटींहून अधिक आहे, जे सर्व जीवन विमा कंपन्यांमध्ये सर्वाधिक आहे, त्यानंतर एचडीएफसी लाइफ (HDFC Life), एसबीआय लाइफ (SBI Life)आणि टाटा एआयए लाइफ (Tata AIA Life) यांनी अनुक्रमे रु. 2,989.17 कोटी, रु. 2,318.77 कोटी, रु. 1,884.41 गोळा केले आहे. 

इंडिव्हिज्युअल नॉन - सिंगल प्रीमियम सेगमेंटमध्ये मार्च 2022 मधील 5,501.12 कोटी रुपयांमध्ये 10.49%ने वाढ होऊन, मार्च 2023 मध्ये 6,077.97 कोटी रुपये झाली.

कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीज (Kotak Institutional Equities)द्वारे जानेवारीमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या अहवालानुसार, सूचीबद्ध विमा कंपन्या, टर्म बिझिनेस, नॉन-पार बिझिनेस, आणि ऑपरेटिंगचे चांगले लीव्हरेज यामुळे  आर्थिक वर्ष 2023च्या 4त्या तिमाहीत नवीन व्यवसायाच्या त्यांच्या मूल्यात 15 -60 टक्के वाढ करण्याची अपेक्षा आहे.    

ब्रोकिंग फर्म, मोतीलाल ओसवाल (Motilal Oswal) यांनी, एलआयसी (LIC)च्या आर्थिक वर्ष 2023च्या 3ऱ्या  तिमाहीच्या परिणामांच्या अद्यतना (अपडेट)नंतर आणि 0.8 पट एंटरप्राइझ मूल्याच्या सप्टेंबर'FY24Eच्या आधारावर, तिच्या फेब्रुवारी 2023च्या अहवालात एलआयसी (LIC)च्या शेअर्सवर 830 रुपये प्रति शेअरच्या लक्ष्य किंमतीसह "बाय (खरेदी)" कॉलची सुरुवात केली.  त्यात उत्पादन/चॅनेल मिक्सचे हळूहळू वैविध्यपूर्णीकरण सुरू आहे आणि तिचे नेतृत्व स्थान टिकवून ठेवण्यासाठी तिच्याकडे सर्व उपयुक्त बाबी (लीव्हर्स) आहेत, असे नमूद केले आहे.