लोकसभेची आचारसंहिता संपली, आता केवळ पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात आचारसंहिता लागू

Santosh Gaikwad June 06, 2024 10:41 PM

 
मुंबई :  राज्यात मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदार संघासाठी निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने मुंबई, कोकण आणि नाशिक विभागात आदर्श आचारसंहिता लागू राहणार असल्याचेही मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.

 लोकसभेच्या निवडणुकांसाठी राष्ट्रीय निवडणूक आयोगामार्फत देशभरात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली होती. आता निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाली असून आदर्श आचारसंहिता संपुष्टात आल्याचे राष्ट्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलं आहे. ही माहिती राज्य मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.