मुंबईत ठाकरे, तर ठाण्यात शिंदेंचा बोलबाला !

Santosh Gaikwad June 04, 2024 09:30 PM


मुंबई : मुंबईत महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं आहे. सहा पैकी ४ जागा मविआने  जिंकल्या आहेत. ठाकरे गटाने ३ जागेवर तर काँग्रेस,  शिंदे गट आणि भाजपने प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवला आहे. शिवसेनेच्या फोडाफोडीनंतरही मुंबईत ठाकरे गटाला मोठं यश मिळालं आहे. तर ठाणे आणि कल्याणात शिंदे गटाचे दोन्ही उमेदवार विजयी झाले आहेत.

 दोन वर्षापूर्वी एकनाथ शिंदे यांनी बंड करून शिवसेना फेाडली.  शिवसेनेच्या फोडाफोडीनंतर निवडणूक आयोगाने शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह दिले तर ठाकरे गटाला मशाल चिन्ह मिळाले. पक्षफुटीनंतर उध्दव ठाकरेे पहिल्यांदाच निवडणुकीला सामेारे गेले. मात्र मुंबईत त्यांना घवघवीत यश मिळालं आहे. लोकसभेच्या या विजयामुळे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचे   चित्रही स्पष्ट झालं आहे.

दक्षित मुंबईत अरविंद सावंत यांची हॅट्रीक 
दक्षिण मुंबईतून ठाकरे गटाचे उमेदवार अरविंद सावंत यांनी विजयाची हॅट्रीक केली आहे त्यांनी शिंदे गटाच्या उमेदवार यामिनी जाधव यांचा ५४ हजार मतांनी पराभव केला आहे. या विजयानंतर अरविंद सावंत म्हणाले की आम्हाला आनंदयाचा आहे की प्रत्येक वेळी मोदींचा चेहरा घेऊन जिंकलो असे भाजपवाले म्हणायचे मात्र आज मला आनंद आहे की मोदींच्या चेह-याशिवाय आम्ही जिंकलो उध्दवजींचा चेहरा घेऊन जिंकलो. 

दक्षिण मध्य मुंबईत अनिल देसाई यांचा विजय 
दक्षिण मध्य मुंबईत ठाकरे गटाचे उमेदवार अनिल देसाई यांचा मेाठा विजय झाला आहे त्यांनी शिंदे गटाचे राहूल शेवाळे यांचा पराभव केला आहे. शेवाळे येथून सलग दोनदा निवडून आले होते मात्र यंदा त्यांना देसाई यांनी ५३ हजार ३८४ मतांनी शेवाळे यांचा पराभव केला आहे. 

ईशान्य मुंबईतून संजय दिना पाटील विजयी 
भाजपचा बालेकिल्ला अशी ओळख असणा-या ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघात ठाकरे गटाचे संजय दिना पाटील यांनी भाजपचे मिहीर कोटेचा यांचा पराभव केला. त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे. संजय दिना पाटील यांना ३ लाख ८९ हजार ६५ मते मिळाली आहेत तर मिहीर केाटेचा यांना ३ लाख ६१ हजार ८२० मते मिळाली आहेत. 

काँग्रेसच्या वर्षा गायकवाड विजयी
मुंबइ्र उत्तर लोकसभा मतदार संघातून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड विजयी झाल्या आहेत वर्षा गायकवाड यांनी भाजपचे उमेदवार वकिल उज्वल निकम यांचा पराभव केला आहे गायकवाड आणि निकम यांच्या अटीतटीची लढत झाली मतमोजणीच्या वेळीही कधी गायकवाड तर कधी निकम आघाडीवर होते त्यामुळे या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष वेधले होते अखेर वर्षा गायकवाड यांनी ५६ हजार मतांनी विजय मिळविला आहे. निकम यांचा पराभव भाजपला धक्कादायक ठरला आहे. 

भाजपचे पियूष गोयल विजयी 
उत्तर मुंबईतून केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांचा विजय झाला आहे. पियूष गोयल यांनी २५४९५७ मतांची आघाडी घेत काँग्रेसचे उमेदवार भूषण पाटील यांचा पराभव केला आहे. मुंबईतून भाजपला एकमेव जागेवर विजय मिळवता आला आहे. मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोड शो केला होता तसेच जाहीर सभा घेतल्या होत्या मात्र मोदींचा करिष्मा दिसून आलेला नाही. 

उत्तर पश्चिम मुंबईत ट्विस्ट कायम 
उत्तर पश्चिम मंबईत शिंदे गटाचे रविंद्र वायकर विरूध्द ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर अशी काँटे कि टक्कर झाली होती. मतमेाजणीच्यावेळी इथल्या विजयाची उत्कंठा पावलोपावली वाढत होती. प्रथम अमोल किर्तीकर यांना विजयी घोषीत करण्यात आले होेते. मात्र वायकर यांनी फेरमतमोजणीची मागणी केली. त्यानंतर फेरमतमोजणीत ४८ मतांनी वायकर यांचा विजय दाखवला. त्या विजयावर किर्तीकर यांनी आक्षेप घेत पून्हा फेरमतमोजणीची मागणी केली.  उत्तर पश्चिम मुंबईत ट्विस्ट निर्माण झाल्याने या मतदार संघाचा फायनल निकाल घोषित करण्यात आलेला नाही.

ठाण्यात नरेश म्हस्के तर कल्याणात डॉ श्रीकांत शिंदे विजयी !

ठाणे लोकसभा मतदार संघातून नरेश म्हस्के आणि कल्याणमधून डॉ श्रीकांत शिंदे यांनी विजय मिळविल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपला बालेकिल्ला राखण्यात यश मिळवलं आहे. शिवसेना फुटीनंतर इथल्या लढतीकडे राज्याचं लक्ष वेधलं होतं. या लढतीत शिंदे यांनी बाजी मारली आहे. 

ठाणे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला समजला जातेा. मात्र लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटप होताना महायुतीमध्ये ठाण्यावरुन तिढा निर्माण झाला होता. एकनाथ शिंदे या मतदारसंघासाठी आग्रही असताना दुसरीकडे भाजपाही या मतदारसंघावर दावा केला होता. मात्र जागावाटपात ठाणे कल्याण हे दोन्ही मतदार संघ शिंदेंच्या वाटयाला आले. ठाण्यातून शिंदे यांचे समर्थक माजी महापौर नरेश म्हस्के यांना उमेदवारी देण्यात आली. तर ठाकरे गटाने राजन विचारे यांना उमेदवारी दिली हेाती. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार राजन विचारे यांचा विजय यांचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र नरेश म्हस्के यांनी ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे यांचा पराभव केला आहे. 

 तसेच कल्याण लोकसभा मतदार संघातून मुख्यमंत्री शिंदे यांचे सुपूत्र डॉ श्रीकांत शिंदे यांनी हॅट्रीक साधली आहे. शिंदे यांनी ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांच्या पराभव केला. त्यामुळे ठाणे आणि कल्याण  या दोन्ही मतदार संघात मुख्यमंत्री शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती अखेर हे दोन्ही गड राखण्यात शिंदेंना यश आलं आहे. 

भिवंडीत केंद्रीय मंत्र्यांचा पराभव, राष्ट्रवादीचे बाळयामामा विजयी  

भिवंडी लोकसभा मतदार संघातून केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचा पराभव झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळया मामा म्हात्रे यांनी विजय मिळवला आहे. त्यांनी कपिल पाटील यांचा  ७९ हजार ९१४ मतांनी पराभव केला आहे. २०१४ आणि २०१९ मध्ये कपिल पाटील हे दोनवेळा खासदार म्हणून निवडून आले. मात्र २०२४ मध्ये त्यांची हॅट्रीक हुकली आहे. कपिल पाटील यांचा पराभव झाल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे. एक्झिट पोलमध्ये कपिल पाटील आघाडीवर तर बाळयामामा पिछाडीवर दाखवण्यात आले होते. त्यामुळे कमळं फुलणार कि तुतारी वाजणार अशी चर्चा रंगली हेाती. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या सुरेश म्हात्रे यांनी भिवंडीत बाजी मारली आहे. 
-------