दुसऱ्या टप्प्यात ३५२ उमेदवारांचे ४७७ अर्ज दाखल
Santosh Gaikwad
April 05, 2024 09:44 AM
मुंबई, दि. ४ : राज्यातील लोकसभा निवडणुक २०२४ च्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान २६ एप्रिल २०२४ रोजी होणार आहे. यासाठी मराठवाडा व विदर्भातील मतदारसंघात उमेदवारी दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. आज सायंकाळपर्यंत एकूण ३५२ उमेदवारांचे ४७७ अर्ज दाखल झाले आहेत.
दुसऱ्या टप्प्यातील एकूण ८ लोकसभा मतदारसंघांमध्ये २६ एप्रिल २०२४ रोजी मतदान होणार असून यामध्ये बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड आणि परभणी या लोकसभा मतदारसंघाचा सामावेश आहे.
आज दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी बुलढाणा २९ उमेदवारांचे ४२ अर्ज, अकोला २८ उमेदवारांचे ४०, अमरावती ५९ उमेदवारांचे ७३, वर्धा २७ उमेदवारांचे ३८, यवतमाळ- वाशिम ३८ उमेदवारांचे ४९, हिंगोली ५५ उमेदवारांचे ७८, नांदेड ७४ उमेदवारांचे ९२ आणि परभणी ४२ उमेदवारांचे ६५ अर्ज दाखल झाले आहेत.