आकाश मधवालच्या 5 विकेट
लखनऊकडून मार्कस स्टॉयनिसने सर्वाधिक 40 धावा केल्या. त्यानंतर काईल मेयर्सने 18, दीपक हुडाने 15 धावा केल्या. मुंबईकडून आकाश मधवालने 5, तर क्रिस जॉर्डन आणि पीयूष चावलाने प्रत्येकी 1 विकेट घेतली. लखनऊचे 3 गडी धावबाद झाले. तत्पूर्वी मुंबईने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 8 गडी गमावून 182 धावा करत लखनऊला विजयासाठी 183 धावांचे आव्हान दिले.
लखनऊचा डाव
याचा पाठलाग करताना लखनऊची सुरूवात खराब झाली. त्यांचा ओपनर प्रेरक मंकड दुसऱ्या षटकात 3 धावांवर बाद झाला. आकाश मधवालने त्याची विकेट घेतली. त्यानंतर चौथ्या षटकात क्रिस जॉर्डनने काईल मेयर्सला 18 धावांवर बाद केले. तर त्यानंतर नवव्या षटकात पीयूष चावलाने कृणाल पंड्याला 8 धावांवर बाद केले. तर पुढच्याच षटकात आकाश मधवालने आयुष बडोनीला 1 धावेवर, तर निकोलस पूरनला शून्यावर बाद केले. त्यानंतर बाराव्या षटकात मार्कस स्टॉयनिस 40 धावांवर धावबाद झाला. तर पुढच्याच षटकात कृष्णप्पा गौतमही 2 धावांवर धावबाद झाला. त्यानंतर पंधराव्या षटकात आकाश मधवालने रवि बिश्नोईला 3 धावांवर बाद केले. तर याच षटकात दीपक हुडा 15 धावांवर धावबाद झाला. तर सतराव्या षटकात आकाश मधवालने मोहसिन खानला शून्यावर बाद करत मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. लखनऊला 16.3 षटकांत सर्व गडी गमावून 101 धावाच करता आल्या.
अशा पडल्या लखनऊच्या विकेट
नवीन उल हकच्या 4 विकेट
मुंबईकडून कॅमेरून ग्रीनने सर्वाधिक 41 धावा केल्या. त्यानंतर सूर्यकुमार यादवने 33, तिलक वर्माने 26, नेहल वढेराने 23, ईशान किशनने 15, टिम डेव्हिडने 13, रोहित शर्माने 11 धावा केल्या. लखनऊकडून नवीन उल हकने 4 विकेट घेतल्या. तर यश ठाकूरने 3, मोहसिन खानने 1 विकेट घेतली.
मुंबईचा डाव
प्रथम फलंदाजी करताना मुंबईची सुरूवात खराब झाली. त्यांचा ओपनर रोहित शर्मा चौथ्या षटकात 11 धावांवर बाद झाला. नवीन उल हकने त्याची विकेट घेतली. त्यानंतर पुढच्याच षटकात यश ठाकूरने ईशान किशनला 12 धावांवर बाद केले. त्यानंतर कॅमेरून ग्रीन आणि सूर्यकुमार यादवने डाव पुढे नेत तिसऱ्या गड्यासाठी 66 धावांची भागीदारी केली. अकराव्या षटकात सूर्यकुमार यादवला 33 धावांवर बाद करत नवीन उल हकने ही जोडी फोडली. नवीनने त्याच षटकात ग्रीनलाही 41 धावांवर बाद केले. यानंतर टिम डेव्हिड आणि तिलक वर्माने डाव पुढे नेत पाचव्या गड्यासाठी 43 धावांची भागीदारी केली. सतराव्या षटकात टिम डेव्हिडला 13 धावांवर बाद करत यश ठाकूरने ही जोडी फोडली. त्यानंतर अठराव्या षटकात नवीन उल हकने तिलक वर्माला 26 धावांवर बाद केले. यानंतर एकोणिसाव्या षटकात मोहसिन खानने क्रिस जॉर्डनला 4 धावांवर बाद केले. यानंतर नेहल वढेरा आणि ऋतिकने शेवटपर्यंत खेळत संघाची धावसंख्या वर नेली. नेहलने 23 धावा केल्या. शेवटच्या चेंडूवर यश ठाकूरने नेहल वढेराला बाद केले.
अशा पडल्या मुंबईच्या विकेट