महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक दिवाळीनंतर : जम्मू-काश्मीर आणि हरियाणाचे वेळापत्रक जाहीर !
Santosh Gaikwad
August 16, 2024 10:49 PM
मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी जम्मू-काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. जम्मू-काश्मीरमध्ये १० वर्षानंतर प्रथमच विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. याआधी २०१४ साली राज्यात विधानसभेच्या निवडणुका झाल्या होत्या. तर ९० सदस्य संख्या असलेल्या हरियाणा विधानसभेचा कार्यकाळ ३ नोव्हेंबर रोजी संपणार आहे.
निवडणुक आयोगाने महाराष्ट्र निवडणुकाचं वेळापत्रक मात्र जाहीर केले नाही. झारखंड आणि महाराष्ट्र या दोन राज्यातील निवडणुका जम्मू काश्मीर आणि हरियाणा राज्यातील निवडणुका पार पडल्यावर होतील असे निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेत स्पष्ट सांगितले आहे. महाराष्ट्र विधानसभेची मुदत येत्या २६ नोव्हेंबरला संपणार आहे. राज्यात दिवाळीनंतर निवडणुका पार पडतील असे विरोधकांकडून सातत्याने आरोप केले जात होते तसेच काही चित्र आजच्या पत्रकार परिषदेत आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
महाराष्ट्राच्या निवडणुकाची तारीख जाहीर न करण्यामागे काही राजकीय कारण आहे का? असा सवाल विचारण्यात आला. यावर निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार म्हणाले, महाराष्ट्रात पाऊस असल्या कारणाने निवडणूक आयोगाचे बरेचसे काम राज्यात बाकी राहिले आहे. तसेच महाराष्ट्रात पुढील काही दिवसात बरेच सण उत्सव आहेत, जसे की गणेशोत्सव, पितृपक्ष, नवरात्र, दिवाळी यामुळे निवडणूक आयोगाने वेळा पत्रक जाहीर केले नाही. याच कारणामुळे निवडणुकाची तारीख जाहीर केली नाही असे आयुक्त म्हणाले.
झारखंड विधानसभेची मुदत ४ जानेवारी २०२५ पर्यंत आहे तर महाराष्ट्राची २६ नोव्हेंबरपर्यंत आहे. २०१९ मध्ये हरियाणा आणि महाराष्ट्रात एकाच वेळी निवडणुका पार पडल्या होत्या. यंदा मात्र दोन्ही राज्यात वेगवेगळ्या निवडणुका पार पडणार आहे. दिवाळीआधी राज्यात निवडणुका पार पडतील असा अंदाज राजकीय तज्ज्ञांकडून मांडण्यात येत होता मात्र आता दिवाळीनंतर निवडणुका पार पडतील असे स्पष्ट संकेत निवडणूक आयोगानेच दिले आहेत.
जम्मू काश्मीरमध्ये तीन टप्प्यात मतदान
पहिला टप्पा- १९ सप्टेंबर २०२४
दुसरा टप्पा- २५ सप्टेंबर २०२४
तिसरा टप्पा- १ ऑक्टोबर २०२४