52, Municipal Ind. Estate,
Dainik Shivner Marg,
Worli, Mumbai - 400018 (India)
मुंबई दि. १३ ऑगस्ट, २०२४ : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे. त्यानुसार त्यांना वित्त विभाग, शासन क्र. शासाउ - १०.१०/ प्र.क्र.९६/१०/६.उ.,१३/३/२०१२ अन्वये विहित केलेल्या सर्व सेवा सुविधा अनुज्ञेय राहतील, असे महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातर्फे एका ज्ञापनाद्वारे कळविण्यात आले आहे.
डॉ. नीलम लतिका दिवाकर गोऱ्हे या सन २००२ पासून विधानपरिषदेच्या सन्माननीय सदस्या असून सध्या त्यांची सदस्यत्वाची ४ थी टर्म सुरू आहे. त्या सन २०१९ पासून विधानपरिषद सभागृहाच्या उप सभापतीपदी कार्यरत आहेत.
*****