सोळा आमदारांच्या अपात्रतेवरील निर्णय विद्यमान अध्यक्षांकडेच - उज्ज्वल निकम
Santosh Sakpal
May 11, 2023 01:43 PM
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर महत्वाचा निर्णय देताना १६ आमदारांच्या अपात्रतेवर विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यायचा आहे, तोही वेळेत घ्यायचा आहे, असा आदेश दिला आहे. त्यावरून हा निर्णय विद्यमान विधानसभा अध्यक्षांना घ्यावा लागेल, त्याआधी न्यायालयाचे निकालपत्र अभ्यासावे लागेल, असे ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिली.
काय म्हणाले ज्येष्ठ विधिज्ञ निकम?
हा निकाल राज्यातील संत्तसांघर्षांवर दाखल केलेल्या सर्व याचिकांवर देण्यात आला आहे. नवाम रेमबिया प्रकरणावर फेर विचार करण्यासाठी हे प्रकरण न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाच्या मोठ्या खंडपीठाकडे वर्ग केला आहे. न्यायालयाने भरत गोगावले यांची व्हीप म्हणून केलेली निवड न्यायालयाने चुकीचे ठरवले आहे. असा व्हीप काढण्याचा अधिकार राजकीय पक्षाचा असतो, असे न्यायालयाने म्हटले आहे. अशा प्रकारे व्हीप नियुक्त करण्याचा विधानसभा अध्यक्ष यांचा निर्णय न्यायालयाने चुकीचा ठरवला, तसेच राज्यपालांनि बहुमताची चाचणी करण्याचा निर्णय न्यायालयाने चुकीचा ठरवला आहे. राज्यपालांना विशेष अधिवेशन बोलावण्यासाठी मंत्रिमंडळाचा निर्णय घेणे अपेक्षित होते, मात्र तरीही राज्यपालांनी तो निर्णय घेताना तथ्य तपासले पाहिजे होते, असे सर्वोच्च न्य्यायालयाने म्हटले आहे.