महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना ठाणे जिल्हा माध्यमिक विभागाच्या जिल्हा कमिटीचे नव्याने पुनर्गठन
Santosh Sakpal
October 19, 2023 05:36 PM
MUMBAI/NHI- महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना ठाणे जिल्हा माध्यमिक विभागाचे पुनर्गठन करण्यासाठी नवीन नियुक्त्या करून ठाणे जिल्हा माध्यमिक विभागाला उभारी देण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे राज्याध्यक्ष मा.श्री.ज.मो.अभ्यंकरसाहेबांच्या आदेशाने मुंबई येथे रविवार दिनांक १५ ऑक्टोबर २०२३ रोजी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेची सभा पार पडली. या सभेसाठी मुंबई व कोकण विभागातून मोठ्या संख्येने संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. मा.अभ्यंकर साहेबांनी नवीन पदाधिकाऱ्यांच्या मुलाखती घेऊन त्यांना संघटनेच्या कार्याबाबत मार्गदर्शन करून नियुक्तीपत्र दिले.
यामध्ये सर्व प्रथम घोषणा करण्यात आली ती सर्वात जास्त उत्सुकता असलेल्या कोकण विभागीय अध्यक्ष पदाबाबत! अनेक उच्च पातळीवरील पदाधिकाऱ्यांनी श्री. जगदीश भगत सरांच्या नावाचे सूचन व अनुमोदन केल्यानंतर मा.अभ्यंकरसाहेबांनी श्री. जगदीश भगत यांच्या नावाची कोकण विभागीय अध्यक्ष म्हणून घोषणा करताच शेकडो कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या गजरात या निर्णयाचं स्वागत केलं. एक निष्ठावंत व प्रामाणिकपणे संघटनेसाठी वाहून घेतलेल्या सक्षम नेतृत्वाची निवड झाल्याने सर्वांना आनंद झाला.
ठाणे जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सक्रियपणे काम करण्याची शपथ पदाधिकाऱ्यांनी घेऊन एकजुटीने काम करण्याचा विश्वास सर्व कार्यकर्त्यांनी साहेबांना दिला. या प्रसंगी मुंबई विभागीय अध्यक्ष श्री अजित चव्हाण सर, कोकण विभागीय अध्यक्ष श्री. जगदीश भगत सर, कार्याध्यक्ष कोकण विभाग श्री.विलास आंग्रे, मुंबई कनिष्ठ महाविद्यालयाचे अध्यक्ष श्री विशाल बावा सर व सरचिटणीस श्री.मंगेश पाटील सर व इतर पदाधिकारी, ठाणे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयाचे अध्यक्ष डॉ. संतोष गायकवाड व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
मा.अभ्यंकर साहेबांच्या शुभहस्ते संपूर्ण ठाणे जिल्ह्यासाठी पुढील नियुक्त्या करण्यात आल्या. जिल्हा अध्यक्ष– श्री. भगवान गावडे, जिल्हा अध्यक्ष (ग्रामीण)- श्री.कुलदीप पाटील, जिल्हा अध्यक्षा (महिला आघाडी)- अँड. शुभांगी निचिते, जिल्हा सचिव- श्री.दिलीप चौधरी, जिल्हा कार्याध्यक्ष- श्री.प्रकाश फर्डे, जिल्हा उपाध्यक्ष- श्री.तुकाराम घाटेघरे, जिल्हा सरचिटणीस श्री गोरख गोसावी, रामहरी केदार-जिल्हा कोषाध्यक्ष, जिल्हा संपर्कप्रमुख-श्री नरेंद्र शिंदे, जिल्हा सरचिटणीस (महिला आघाडी)- सौ. रुपाली राऊत, ठाणे शहर अध्यक्षा (महिला आघाडी)- सौ शोभा गरांडे, ठाणे शहर अध्यक्ष- श्री राजेंद्र पवार, श्री.उदय कदम-ठाणे शहर उपाध्यक्ष, शहापूर तालुका अध्यक्ष – श्री.धनाजी धसाडे , शहापूर तालुका सचिव -श्री महेंद्र गायकर, भिवंडी तालुका कमवि अध्यक्ष -श्री निलेश पवार. अशाप्रकारे पदांचे वाटप करून ठाणे जिल्हा शिक्षक सेना माध्यमिक विभाग संघटनेचे पुनर्गठन करण्यात आले. मा.श्री. ज.मो.अभ्यंकरसाहेबांनी सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देऊन पुढील वाटचालीसाठी आशीर्वाद दिले.