राज्यात ‘ऑरेंज’ व ‘यलो अलर्ट’, ठाण्यात सकाळपासूनच पावसाची हजेरी

Santosh Sakpal April 30, 2023 12:12 AM

मुंबई : भारतीय हवामान खात्याने पुढील पाच दिवस राज्यातील विविध जिल्ह्यांना मूसळधार पावसाचा (ऑरेंज व यलो अलर्ट) इशारा दिला आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरणात सतत बदल होत आहेत. भर उन्हाळ्यात देखील अनेक ठिकाणी गारपीट आणि अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे उन्हाचा पारा देखील उंचावला आहे. अशातच भारतीय हवामान खात्याने पुढील पाच दिवस राज्यातील विविध जिल्ह्यांना मूसळधार पावसाचा (ऑरेंज व यलो अलर्ट) इशारा दिला आहे.

ठाण्यात अवकाळी पावसाची हजेरी

गेल्या काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अशातच शनिवार २९ एप्रिल रोजी सकाळपासूनच अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. ऐन उन्हाळ्यात पडणाऱ्या पावसामुळे अनेक आजारांना तोंड द्यावे लागत आहे. अनेकांचे नुकसान झाले आहे.

या जिल्ह्यांना मिळाला ऑरेंज व यलो अलर्ट

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भातील अकोला, वाशिम, यवतमाळ आणि चंद्रपूर या चार जिल्ह्यांना २९ एप्रिलला ऑरेंज अलर्ट (Unseasonal Rain) देण्यात आला आहे. दरम्यान, मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर, उत्तर महाराष्ट्रातील उर्वरित जिल्हे, विदर्भ आणि छत्रपती संभाजी नगर वगळता सर्व जिल्ह्यांना पिवळा अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भातील नागपूर, भंडारा, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात ३० एप्रिलला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.